Solapur Crime : सोलापूरकरांसाठी गुरुवार ठरला घातवार, एकाच दिवशी पाच जणांनी संपवली जीवनयात्रा

सोलापुरकरांसाठी गुरुवारचा दिवस अतिशय धक्कादायक ठरला. एकाच दिवशी पात जणांनी जीवनाला अलविदा केल्याने एकच खळबळ उडाली.

Solapur Crime : सोलापूरकरांसाठी गुरुवार ठरला घातवार, एकाच दिवशी पाच जणांनी संपवली जीवनयात्रा
सोलापुरात एकाच दिवशी पाच जणांनी जीवन संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 3:12 PM

सोलापूर / 4 ऑगस्ट 2023 : सोलापुरांसाठी गुरुवारचा दिवस घातवार ठरला आहे. एकाच दिवशी पाच जणांनी जीवन संपवल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. यापैकी सोलापूर शहरात 3 तर बार्शी तालुक्यात 2 जणांनी एकाच दिवशी टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली. अजिंक्य राऊत, यशराज निंबाळकर, सुनील कोळी, ऋत्विक शिंदे आणि तुषार पाटील अशी मयतांची नावे आहेत. विशेष म्हणजे या पाचही जणांनी जीवन का संपवले याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरु आहे. विशेष म्हणजे पाच मयतांपैकी चौघे जण महाविद्यालयीन तरुण आहेत. तर एक हॉटेल व्यावसायिक आहे. पोलीस तपासानंतरच या पाच जणांनी जीवनाला अलविदा का केला हे निष्पन्न होईल.

सोलापूर शहरात तिघांनी मृत्यूला जवळ केले

शहरातील कुमठा नाका येथील शिवगंगा नगर येथे राहणारा यशराज निंबाळकर हा गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी बेडरुममध्ये कपडे बदलण्यासाठी गेला तो बाहेर आलाच नाही. घरच्यांनी जाऊन पाहिले तर यशराज मृतावस्थेत पडला होता. याच परिसरातील सुनील कोळी हा तरुण भिंती रंगवण्याचे काम करायचा. त्यानेही गुरुवारी सकाळी राहत्या घरात आपले जीवन संपवले. तर सोलापुरातील सुप्रसिद्ध ध्रुव हॉटेलचे मालक अजिंक्य जयवंत राऊत यांनी राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून घेतली. या तिघांनी टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र राऊत यांनी आजारपणाला कंटाळून जीवन संपवल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी सोलापूर शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

बार्शी तालुक्यात दोघा तरुणांचा जगाला अलविदा

बाभूळगाव येथील ऋत्विक हनुमंत शिदे हा तरुण श्री शिवाजी महाविद्यालयात बीएससीच्या पहिल्या वर्षाला शिकत होता. अज्ञात कारणातून त्याने पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे जाऊन स्वतःचे जीवन संपवले. तर बार्शी तालुक्यातील भोयरे गावात तुषार पाटील हा शेती आणि अंड्याचा व्यवसाय करत होता. तुषारनेही राहत्या घरीच मृत्यूला जवळ केले. या दोघांच्याही मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी बार्शी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पोलीस मृत्यू प्रकरणी सखोल तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.