बियर दिली नाही म्हणून टोळक्यानं जे काही केलं, ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल, नाशिकमध्ये काय घडलं?
नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बियर न देण्यावरून झालेल्या वादाची संपूर्ण जिल्हाभर चर्चा होऊ लागली आहे. अंबड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक : राग आल्यानंतर कधी काय होईल याचा काही नेम नसतो. असाच राग एका बियर खरेदीसाठी गेलेल्या तरुणाला आला होता. बारमालक बियर देत नाही म्हणून त्याने जे कृत्य केलं आहे. ते ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहे. रात्रीच्या वेळी हॉटेल बंद करण्याची तयारी सुरू असतांना अचानक एक तरुण आला आणि बियरची मागणी केली. मात्र, बार मालकाने बंद करण्याची वेळ झाली आहे, आता देता येणार नाही म्हणून बियर देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने बारमालकासह त्याच्या मुलाला टोळक्याने बेदम मारहाण केली आहे.
बारमालक या मारहाणीत गंभीर जखमी झाला असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सिडकोतील मैफिल बार रेस्टॉरंट या ठिकाणी ही घटना घडली आहे.
यामध्ये बारमालक अशोक गोविंदराव कांचेला हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर बारबालकाचा मुलगा निखिल यालाही मारहाण झाली आहे.
मध्यरात्रीच्या वेळी ही मारहाण सुरू असतांना अंबड पोलीस तात्काळ हजर झाले होते. अंबड पोलिसांचे वाहन बघताच मारहाण करणारी टोळी पसार झाली, मात्र यातील एकाला अंबड पोलीसांनी अटक केली आहे.
प्रशिक अडांगळे आणि गणेश खांदवे हे दोघे बारच्या बाहेर रविवारी आले होते. त्यावेळी त्यांनी बियरची मागणी केली होती. मात्र बारमालकाने नकार दिल्याने हा राडा झाला आहे.
बियर न दिल्याचा राग आल्यानंतर प्रशिक अडांगळे आणि गणेश खांदवे या दोघांनी त्यांच्या मित्राला बोलावले होते. त्यावेळी लागलीच त्यांचे मित्र आल्यानंतर त्यांनी बारमालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली होती.
बारमालकाला शिवीगाळ, दगडाने आणि बियरच्या बाटलीने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून अंबड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे, अंबड पोलीस घटनास्थळी पोहचल्याने बारमालकाचा जीव वाचल्याची चर्चा होऊ लागली आहे.
नाशिक शहरात टवाळखोरांनी घातलेला धुडगूस संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. यातील एका संशयिताला अंबड पोलीस अटक केली असून इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे.