Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sandalwood Smuggler : मावळच्या दुर्गम भागात पुष्पा गॅंगचा धुमाकूळ, दहा ते बारा जणांची टोळी सक्रीय; गावकरी भयभीत

पु्ण्यात (Pune) चंदन झाडांची तस्करी (Smuggling of sandalwood trees) वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण मागच्या दोन दिवसापुर्वी पुण्यातील एका नदीत चंदनाचे ओंडके लपवले असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांनी (Pune Police) तिथून सगळे ओंडके ताब्यात घेतले.

Sandalwood Smuggler : मावळच्या दुर्गम भागात पुष्पा गॅंगचा धुमाकूळ, दहा ते बारा जणांची टोळी सक्रीय; गावकरी भयभीत
मावळच्या दुर्गम भागात पुष्पा गॅंगचा धुमाकूळImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 9:20 AM

पुणे – पु्ण्यात (Pune) चंदन झाडांची तस्करी (Smuggling of sandalwood trees) वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण मागच्या दोन दिवसापुर्वी पुण्यातील एका नदीत चंदनाचे ओंडके लपवले असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांनी (Pune Police) तिथून सगळे ओंडके ताब्यात घेतले. आता आंदर मावळातील वडेश्वर गावात दहा ते बारा चंदन चोरांच्या टोळक्याने मध्यरात्री चंदनाचे झाड कापून नेले आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून चोरट्यांना विरोध केला म्हणून त्यांनी शेतकऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. शेतकऱ्याला त्याच्या घरात डांबून ठेवले. चंदन चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला आहे. झालेल्या प्रकारामुळे पोलिसांनी दुर्गम भागात गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. वडगाव पोलिस चंदन चोरांचा शोध घेत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण

आंदर मावळातील वडेश्वर गावात चंदनाची अनेक झाडे आहेत. महेश शिंगारे यांच्या अंगणात चंदनाचं एक जुन झाडं आहे. मध्यरात्रीच्या वेळेस काही चंदन तस्करी करणारे वडेश्वर गावात आले. त्यावेळी त्यांनी महेश शिंगारे यांच्या अंगणात असलेलं झाडं तोडायला सुरूवात केली. परंतु आवाज येत असल्याने महेश शिंगारे झोपेतून जागे झाले. चोरट्यांना विरोध केला असता. चोरट्यांनी महेश शिंगारे यांना मारहाण केली आणि घरात डांबून ठेवलं. हातातली शस्त्र दाखवून लोकांना भीती दाखवली. तसेच परिसरातल्या लोकांच्या घरावरती देखील दगडफेक केली. याबाबत महेश शिंगारे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या टोळीचा मोरक्या कोण आहे. टोळीत लोक किती आहेत याची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

भोर तालुक्यात नदीपात्रात आढळले चंदनाचे ओंडके

पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात बनेश्वर वन उद्यानाच्या शेजारी असलेल्या शिवगंगा नदी आहे. नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या पोलिस हवालदाराच्या पायाला काय तरी लागतंय म्हणून त्यांनी खोलवर जाऊन पाहिलं. तर त्यांना चंदनाचं झाडं असल्याचा संशय आला. ही बाब त्यांनी जवळच्या संबंधित पोलिस स्टेशनला तात्काळ कळवली. त्यावेळी नदीच्या पात्रात त्यांना तब्बल पंधरा चंदनाचे ओंडके सापडले आहेत. त्यामुळे पुण्यात चंदन तस्कर मोठ्या प्रमाणात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती.

Bullock Cart Race VIDEO | वेगवान बैल जोडीसमोर मालक पडला, पायाखाली तुडवला जाणार तोच…

Netresh Sharma : करौली हिसांचारात आगीत अडकलेलं कुटुंब, तिघांचा जीव वाचवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलच्या धाडसाची देशभर चर्चा

IPL 2022 points table : लखनौची आगेकुच, हैदराबाद मात्र निराश, IPLमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.