पुणे – पु्ण्यात (Pune) चंदन झाडांची तस्करी (Smuggling of sandalwood trees) वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण मागच्या दोन दिवसापुर्वी पुण्यातील एका नदीत चंदनाचे ओंडके लपवले असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांनी (Pune Police) तिथून सगळे ओंडके ताब्यात घेतले. आता आंदर मावळातील वडेश्वर गावात दहा ते बारा चंदन चोरांच्या टोळक्याने मध्यरात्री चंदनाचे झाड कापून नेले आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून चोरट्यांना विरोध केला म्हणून त्यांनी शेतकऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. शेतकऱ्याला त्याच्या घरात डांबून ठेवले. चंदन चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला आहे. झालेल्या प्रकारामुळे पोलिसांनी दुर्गम भागात गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. वडगाव पोलिस चंदन चोरांचा शोध घेत आहेत.
आंदर मावळातील वडेश्वर गावात चंदनाची अनेक झाडे आहेत. महेश शिंगारे यांच्या अंगणात चंदनाचं एक जुन झाडं आहे. मध्यरात्रीच्या वेळेस काही चंदन तस्करी करणारे वडेश्वर गावात आले. त्यावेळी त्यांनी महेश शिंगारे यांच्या अंगणात असलेलं झाडं तोडायला सुरूवात केली. परंतु आवाज येत असल्याने महेश शिंगारे झोपेतून जागे झाले. चोरट्यांना विरोध केला असता. चोरट्यांनी महेश शिंगारे यांना मारहाण केली आणि घरात डांबून ठेवलं. हातातली शस्त्र दाखवून लोकांना भीती दाखवली. तसेच परिसरातल्या लोकांच्या घरावरती देखील दगडफेक केली. याबाबत महेश शिंगारे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या टोळीचा मोरक्या कोण आहे. टोळीत लोक किती आहेत याची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.
पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात बनेश्वर वन उद्यानाच्या शेजारी असलेल्या शिवगंगा नदी आहे. नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या पोलिस हवालदाराच्या पायाला काय तरी लागतंय म्हणून त्यांनी खोलवर जाऊन पाहिलं. तर त्यांना चंदनाचं झाडं असल्याचा संशय आला. ही बाब त्यांनी जवळच्या संबंधित पोलिस स्टेशनला तात्काळ कळवली. त्यावेळी नदीच्या पात्रात त्यांना तब्बल पंधरा चंदनाचे ओंडके सापडले आहेत. त्यामुळे पुण्यात चंदन तस्कर मोठ्या प्रमाणात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती.