Sheena Bora Murder Case: तुरूंगातून बाहेर पडताच इंद्राणी मुखर्जी म्हणाली, ‘मी जेलमध्ये बरच काही शिकले’
माझ्या सोबत या काळात माझ्या वकील सोबत राहिल्या त्यांनी मला साथ दिली. तर तुरूंगात मी एक पुस्तक लिहते आहे या केससंदर्भात ते नाहीये पण लवकरच तुम्हाल ही ते कळेल
मुंबई : आपल्या पोटच्या मुलीच्या हत्येप्रकरणी जेलमध्ये असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीला (Indrani Mukharjee) कोर्टाने दिलासा देताना तिचा जामीन मंजूर केला होता. इंद्राणी मुखर्जीवर मुलगी शीना बोरा (Sheena bora)हिच्या हत्या अरोप होता. त्याप्रकरणी ती गेल्या सहा वर्षांपासून मुंबईच्या भायखळा महीला तरुंगात शिक्षा भोगत होती. तर तिला 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने 2 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन (bail) मंजूर केला होता. त्यानंतर ती बाहेर पडेल असे वाटत होते. मात्र तिची 19 मे ची देखील रात्र तुरूगातच गेली. त्यावेळी तिचे वकील एड सना खान यांनी सांगितलं होतं की, सत्र न्यायालयाची कायदेशीर बाबी पार पडली आहे. तसेच जी न्यायालयाने रक्कम सांगितली आहे ती उद्या (20 मे रोजी) सकाळी भरू, त्यानंतर इंद्रायणी यांची जामिनावर भायखळा तुरूंगातून मुक्तता होईल. त्याप्रमाणे आज पैसे भरण्यात आले असून तिची तब्बल 6 वर्षानंतर आता जामीनावर मुक्तता झाली आहे.
Sheena Bora murder case | Indrani Mukherjea walks out of Byculla Jail a day after she was granted bail by Special CBI court on Rs 2 lakh surety.
हे सुद्धा वाचा"I am very happy," she says. pic.twitter.com/JWSVqJuc2b
— ANI (@ANI) May 20, 2022
शीना बोरा हत्या प्रकरणी गेल्या 6 वर्षाहून अधिक काळ इंद्राणी मुखर्जी तुरुंगात होत्या. दरम्यानच्या काळात तुरूंगात इंद्राणी मुखर्जी हिची प्रकृती खालावली होती. तर इंद्रायणी विविध आजारांनी त्रस्त होत्या. तिला उपचाराची ही गरज असलायचे कारण सांगत तिने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. याच आधारावर सुप्रीम कोर्टाने साक्षीदारांना भेटू नये व 2 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यानंतर जेलमधून सुटका झाल्यानंतर इंद्राणी मुखर्जी घरी गेल्या. त्यानंतर इंद्राणी मुखर्जी त्यांच्या वकिलांसोबत बाहेर आल्या आणि माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी ती म्हणाली, केससंदर्भात बोलणार नाही मात्र जेलमध्ये बरच काही शिकले. माझं कुटुंब माझ्यापासून दूर झाल. पण ते जे जे लोक तुरुंगात जातात त्या सगळ्यांच्याच बाबतीत होत. मी आजपासून नवीन प्रवासाला सुरुवात करतेय. नव्या प्रवासाबद्दल अजून काही ठरवलेल नाही असेही इंद्राणी म्हणाली.
तसेच यावेळी इंद्राणी म्हणाली, माझ्या सोबत या काळात माझ्या वकील सोबत राहिल्या त्यांनी मला साथ दिली. तर तुरूंगात मी एक पुस्तक लिहते आहे या केससंदर्भात ते नाहीये पण लवकरच तुम्हाल ही ते कळेल. तसेच मला ज्या ज्या लोकांनी सपोर्ट दिला त्या सगळ्यांचे आभार.
Mumbai | "I am just going home…Empathy and forgiveness…I have forgiven all the people who have hurt me. I have learned a lot in the jail," said Indrani Mukherjea after leaving from Byculla Jail earlier this evening. pic.twitter.com/NK7g8rjMNX
— ANI (@ANI) May 20, 2022
कोण आहे इंद्राणी मुखर्जी?
शीना बोरा खून प्रकरण उघडकीस येईपर्यंत इंद्राणी मुखर्जी ही देशातील प्रसिद्ध मीडिया व्यक्तिमत्त्व होती. ती कोट्यवधी रुपयांची मालकीण होती आणि देशातील खाजगी टीव्ही चॅनेल यशस्वी करणाऱ्या पीटर मुखर्जी यांच्या पत्नी होत्या. पीटर मुखर्जी ही अशीच व्यक्ती होती. ज्यांच्या नेतृत्वाखाली स्टार इंडिया देशात तारेप्रमाणे चमकली. इंद्राणी ही पीटरची दुसरी पत्नी होती, तर इंद्राणीचे हे तिसरे लग्न होते.
Sheena Bora murder case | Indrani Mukerjea reaches her home in Mumbai. She was released from Byculla Jail earlier this evening a day after she was granted bail by Special CBI court on Rs 2 lakh surety. pic.twitter.com/kVdGyLQzjb
— ANI (@ANI) May 20, 2022
इंद्राणी मुखर्जीचा जन्म 22 नोव्हेंबर 1972 रोजी आसाममधील गुवाहाटी येथे झाला. त्यांनी 1996 मध्ये कोलकाता येथे एक रिक्रूटमेंट कंपनी सुरू केली. त्याने त्याचे नाव INX सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ठेवले. इंद्राणी 2001 मध्ये कोलकाताहून मुंबईत आली. त्यांची कंपनी स्टार इंडियासाठी भरतीचे कामही पाहत असे. यादरम्यान तिची पीटर मुखर्जी यांच्याशी भेट झाली आणि 2002 मध्ये दोघांनी लग्न केले.
पीटर आणि इंद्राणी मुखर्जी INX समूहाचे प्रवर्तक
डिसेंबर 2006 मध्ये, पीटर आणि इंद्राणी मुखर्जी INX समूहाचे प्रवर्तक बनले. समूहात INX सर्व्हिसेस, INX एक्झिक्युटिव्ह सर्च आणि INX मीडिया आणि INX न्यूज सारख्या मीडिया कंपन्या समाविष्ट होत्या. इंद्राणी मुखर्जी INX समूहाच्या अध्यक्षा झाल्या. पीटर आणि इंद्राणी यांची INX मीडियामध्ये 50% भागीदारी होती.
2008 मध्ये, जेव्हा जगभरात आर्थिक मंदी होती, तेव्हा INX मीडियाची स्थितीही बिकट झाली होती. कर्मचाऱ्यांना देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. नंतर पीटर आणि इंद्राणीने कंपनी विकली. मे 2011 मध्ये पीटर आणि इंद्राणी यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामाही दिला होता.
2015 मध्ये शीना बोरा हत्याकांड उघड झाल्यानंतर इंद्राणी आणि पीटर यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. इंद्राणी आणि पीटरचा ऑक्टोबर 2019 मध्ये खटला सुरू असतानाच घटस्फोट झाला. या प्रकरणात पीटरला 2020 मध्ये जामीन मिळाला होता.