Wardha : आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडून आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयासह कदम हॉस्पिटलमध्ये पाहणी

आरोग्य विभागाच्या अतिरिरक्त संचालक अर्चना पाटील सकाळी आर्वीमध्ये आल्या होत्या. डॉ. अर्चना पाटील यांनी सुरूवातीला उपजिल्हा रुग्णालयात पाहणी केली. येथे जवळपास एक ते दीड तास त्यांनी माहिती घेत चौकशी केली. यावेळी त्यांनी रुग्णालय परिसराची पाहणी केली.

Wardha : आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडून आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयासह कदम हॉस्पिटलमध्ये पाहणी
आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडून आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयासह कदम हॉस्पिटलमध्ये पाहणी
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 12:21 AM

वर्धा : आर्वीच्या कदम रुग्णालयातील गर्भपात प्रकरणात आरोग्य विभागाने चौकशीचे फास आवळले आहेत. आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आज आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालया(Arvi Sub-District Hospital)त जवळपास एक ते दीड तास पाहणी करत माहिती घेतली. तसेच कदम हॉस्पीटल(Kadam Hosptal)मध्येही पाहणी केली. यावेळी डॉ. पाटील यांच्यासोबत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सचिन तडस, वैद्यकीय अधीक्षक मोहन सुटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर सुटे, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. त्यात उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ नसल्याने रुग्णांना येत असलेल्या अडचणींची माहिती दिली. (Inspection at Kadam Hospital along with Arvi Sub-District Hospital by Additional Director of Health Department)

आरोग्य विभागाच्या अतिरिरक्त संचालक अर्चना पाटील सकाळी आर्वीमध्ये आल्या होत्या. डॉ. अर्चना पाटील यांनी सुरूवातीला उपजिल्हा रुग्णालयात पाहणी केली. येथे जवळपास एक ते दीड तास त्यांनी माहिती घेत चौकशी केली. यावेळी त्यांनी रुग्णालय परिसराची पाहणी केली. येथील चौकशीनंतर डॉ. पाटील यांनी कदम हॉस्पीटलची पाहणी केली. गोबरगॅसचा खड्डा तसंच इतर भागाची त्यांनी पाहणी करत माहिती घेतली.

जिल्ह्याच्या गर्भपात केंद्रांसह सोनोग्राफी सेंटरची तपासणी नाहीच

जिल्ह्यात 34 खासगी तर 11 शासकीय गर्भपात केंद्र असून सुमारे 40 वर सोनोग्राफी सेंटर असल्याची माहिती आहे. या सर्व केंद्रासह सोनोग्राफी सेंटरची तपासणी झाली नसल्याची चर्चा आहे. आर्वीच्या कदम रुग्णालयात अवैध गर्भपाताचा हा प्रकार उघडकीस येताच जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर आणि गर्भपात केंद्राची भरारी पथकांद्वारे तपासणी करण्याची नितांत गरज होती. जर कदम रुग्णालयात हा प्रकार सुरु होता तर अशा अनेक केंद्रांवर असा प्रकार सुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आरोग्य विभागाने तपासणी करण्याचे साधे पावलेही उचललेली नाही यामुळे आरोग्य विभागाच्या कार्याप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

न्यायालयाने दोन्ही परिचारिकांचा जामीन अर्ज नाकारला

आर्वी येथील गर्भपात प्रकरणात एकूण सहा लोकांना आर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात अल्पवयीन मुलाचे आई, वडील, डॉक्टर रेखा कदम, डॉक्टर नीरज कदम आणि दोन परिचारिका यांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या हे सर्व न्यायालयीन कोठडीत आहे. याच दरम्यान कदम रुग्णालयाच्या दोन्ही परिचारिकांनी न्यायलयात जामीन अर्ज दाखल केला होता मात्र न्यायलयाने त्यांना जामीन नाकारल्याची माहिती आहे. (Inspection at Kadam Hospital along with Arvi Sub-District Hospital by Additional Director of Health Department)

इतर बातम्या

Pune Crime : शिरुरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

Gowandi: अल्पवयीन सफाई कर्मचारीने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू, गोवंडीतील धक्कादायक प्रकार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.