Delhi Drugs Seized : दिल्लीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, 130 कोटींचे हेरॉईन जप्त
अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी दिल्ली पोलीस सतत ड्रग्ज तस्करांविरोधात मोहिमा राबवत आहेत. या मोहिमेअंतर्गत या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थांची तस्करी (Smuggling) करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश (Gang Busted) केला आहे. या टोळीकडून संपूर्ण भारतातील कारवाईत पोलिसांनी 130 कोटी रुपयांचे 21,400 किलो सुपर क्वालिटी हेरॉईन (Heroin) जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये एका अफगाण नागरिकाचा समावेश आहे. परवेझ आलम, शमी कुमार उर्फ शमी, रजत गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आतापर्यंतचे पोलिसांचे हे सर्वात मोठे यश असल्याचे डीसीपी क्राइम ब्रँच केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले.
दिल्ली पुलिस की अपराध शाखा ने अंतर्राष्ट्रीय ड्रग सिंडिकेट का भंडाफोड़ किया और अखिल भारतीय अभियान में 130 करोड़ रुपये(अंतर्राष्ट्रीय बाजार में) की 21,400 कि.ग्रा अति सूक्ष्म गुणवत्ता वाली हेरोइन बरामद की। एक अफगान नागरिक सहित 4 आरोपी पकड़े गए: केपीएस मल्होत्रा, DCP क्राइम ब्रांच pic.twitter.com/xo0pDLP0hS
हे सुद्धा वाचा— ANI_HindiNews (@AHindinews) July 29, 2022
दिल्ली पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात कारवाई करत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने अफगाणिस्तानातून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाई दरम्यान, परवेझ आलम, शमी कुमार उर्फ शमी, रजत गुप्ता आणि एका अफगाण नागरिक या चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 21,400 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन आणि 26.53 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी दिल्ली पोलीस सतत ड्रग्ज तस्करांविरोधात मोहिमा राबवत आहेत. या मोहिमेअंतर्गत या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आरोपींपैकी एकाचा यापूर्वीही एनडीपीएस कायद्यात सहभाग होता. आरोपी परवेज आलम हा हेरॉईन बनवण्यात तरबेज असून ड्रग्ज सिंडिकेटमधील डॉक्टर म्हणून त्याची ओळख आहे, असे डीसीपी मल्होत्रा यांनी सांगितले. (International drug smuggling busted in Delhi, heroin worth 130 crore seized)