पत्नीशी माफी मागितली, बँक पासवर्ड शेअर केले, मग पंधराव्या मजल्यावरुन इंजिनिअरची उडी…काय घडला प्रकार
Crime News: पंकज याची पत्नी जालंधर गावी गेली होती. आत्महत्या करण्यापूर्वी पंकजने पत्नीला फोन करुन तिची माफी मागितली. त्यानंतर एक मेल आणि मेसजच्या माध्यमातून तिला बँकेची खाती आणि त्याचे पासवर्ड शेअर केले. दरम्यान या प्रकरणानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले.
नवी दिल्लीजवळील नोएडमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. नोएडा सेक्टर-75 मधील पंचशील प्रतिष्ठा सोसायटीमध्ये एका आयटी अभियंत्याने पंधराव्या मजल्यावरुन उडी मारली. उडी मारण्यापूर्वी त्याने पत्नीला फोन केला होता. तिची माफी मागितली होती. तसेच त्याच्या बँक खात्याची माहिती आणि पासवर्ड शेअर केले होते. आयटी अभियंता असणाऱ्या या व्यक्तीचे नाव पंकज आहे. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होत्या. त्यासाठी औषधी घेत होता. दरम्यान, पोलिसांना त्याच्याकडे सुसाइड नोट आढळून आली नाही.
पंकज आयटी कंपनीत
नोएडा पोलीस अधीक्षक शैव्या गोयल यांनी सांगितले की, पंचशील प्रतिष्ठा सोसायटीमधील टॉवर आठच्या फ्लॅट क्रमांक 1508 मध्ये 36 वर्षीय पंकज, पत्नी आणि मुलांसह राहत होता. मंगळवारी दुपारी पंकजने अचानक त्याच्या पंधराव्या मजल्यावरील फ्लॅटवरुन उडी मारली. आवाज ऐकून सोसायटीचे सुरक्षा रक्षक त्याठिकाणी पोहचले. परंतु पंकजचा मृत्यू झाला होता. पंकज सेक्टर-126 मधील एका आयटी कंपनीत कार्यरत होता.
पत्नी गेली होती गावी
पंकज याची पत्नी जालंधर गावी गेली होती. आत्महत्या करण्यापूर्वी पंकजने पत्नीला फोन करुन तिची माफी मागितली. त्यानंतर एक मेल आणि मेसजच्या माध्यमातून तिला बँकेची खाती आणि त्याचे पासवर्ड शेअर केले. दरम्यान या प्रकरणानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमधून तपास सुरु केला आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. त्यासंदर्भात त्याने डॉक्टरांकडून उपचार सुरु केले होते.
घटनेची माहिती मिळाल्यावर पंकजचा परिवार जालंधरमधून दिल्लीकडे येण्यास निघाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पंकजची पत्नी आल्यावर त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.