Ambernath Murder : अंबरनाथमधील ‘त्या’मृतदेहाचं गूढ उकललं! भाईगिरीच्या नादात तरुणाची पाच जणांनी केली हत्या
अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई तलावात 4 ऑगस्ट रोजी एका तरुणाचा पोत्यात भरलेला मृतदेह आढळला होता. हा मृतदेह उल्हासनगरच्या हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या विशाल राजभर याचा असल्याचं निष्पन्न झालं होतं.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका तरुणाची हत्या (Murder) करुन मृतदेह पोत्यात भरून तलावात फेकल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणाचं गूढ (Mystery) सोडवण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी दोन जणांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहे. विशाल राजभर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. भाईगिरीच्या नादात तरुणाची पाच जणांनी मिळून विशालची हत्या केल्याचे उघड झाले आहे. रोशन सहानी, सचिन चौहान, अजय जैस्वार, समीर सिद्धीकी अशी अटक करण्या आलेल्या आरोपींची नावे असून, एक आरोपी अल्पवयीन आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं उत्तर प्रदेशात रवाना झाली आहेत.
हत्या करुन मृतदेह पोत्यात भरुन तलावात फेकला
अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई तलावात 4 ऑगस्ट रोजी एका तरुणाचा पोत्यात भरलेला मृतदेह आढळला होता. हा मृतदेह उल्हासनगरच्या हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या विशाल राजभर याचा असल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर या प्रकरणाचा तपास करताना ही हत्या भाईगिरीच्या नादात झाल्याचं समोर आलं आहे. विशालचा मित्र स्वप्नील उर्फ आर के जैस्वार याला काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी मारहाण केली होती. ही मारहाण सचिन चौहान या गुंड प्रवृत्तीच्या तरुणाच्या सांगण्यावरून झाल्याचा संशय मृत विशाल राजभर याला होता. यामुळे त्याने 30 जुलै रोजी सचिन चौहान याला चारचौघात मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचा राग काढण्यासाठी सचिन चौहान याने 1 ऑगस्ट रोजी त्याचे सहकारी अजय जैस्वार, रोशन सहानी, समीर सिद्दीकी आणि एक अल्पवयीन मुलगा यांच्या मदतीने विशाल राजभर याला ऑर्डनन्स इस्टेट परिसरात गाठत त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून तो वर येऊ नये म्हणून त्याला दगडाच्या गोण्या बांधून तलावात फेकून दिला.
आरोपींमध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रोशन सहानी आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. मुख्य आरोपी सचिन चौहान याच्यासह अजय जैस्वार आणि समीर सिद्दीकी यांच्या शोधासाठी उत्तर प्रदेशात पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे. (It is revealed that a youth in Ambernath was killed due to Goonism)