कुख्यात गुंड जेलमध्ये, टोळीची कमान गर्लफ्रेंडने सांभाळली, शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या, पोलिसांकडून धडक कारवाई
झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका कुख्यात शार्प शूटरला अटक केली (Jailed gangster girlfriend running cartel from girls hostel threatens businessmen).
रांची : झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका कुख्यात शार्प शूटरला अटक केली. पण तरीही शहरातील अराजकता कमी होताना दिसत नव्हती. शहरातील अनेक उद्योगपतींना धमकीचे फोन किंवा खंडणी मागण्याचे प्रकार सुरुच होते. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केला असता जे समोर आलं त्याने पोलीसांनाही धक्का बसला. पोलिसांनी ज्या कुख्यात गुंडाला अटक केली होती. त्याची गर्लफ्रेंड रांची शहरातील मुलींच्या हॉस्टेलमध्ये बसून त्याची गँग चालवत होती. पोलिसांनी मोठ्या शिताफीने तिला अटके केली (Jailed gangster girlfriend running cartel from girls hostel threatens businessmen).
नेमकं प्रकरण काय?
रांची पोलिसांनी काही दिवसांपूर्वी झारखंडमधला कुख्यात शार्फ शूटर आणि गुंड महेश सुजित सिन्हा याला अटक केली होती. मात्र, त्याची टोळी तरीही शहरात कार्यरत होती. त्याची गर्लफ्रेंड प्रियंका कुमार सिंह हिच्या नेतृत्वात त्याच्या टोळीचं काम सुरु होतं. सुजीतला अटक झाल्यानंतर रांची शहर आणि त्यापासून काही अंतरावर असलेल्या भागात तीच हप्ता वसूल करत होती.
आरोपी तरुणी खंडणी गोळा करायची
प्रियंका सिंह जेव्हा व्यापाऱ्यांना धमकी देण्यासाठी बाजारात गेली तेव्हा पहिल्यांदा लोकांना कुणीतरी माथेफिरु तरुणी असल्याचं वाटलं. मात्र, त्यानंतर तिने अनेकांकडून खंडणी वसूल केली. तिला पोलिसांनी जेव्हा अटक केली तेव्हा तिच्याजवळ शहरातील अनेक मोठमोठे बिल्डर, उद्योगपतींचे नाव, फोन नंबर आणि पत्ता मिळाला. ती या सर्वांना फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटू खंडणीची मागणी करुन धमकी द्यायची.
पोलिसांना आरोपीचा सुगावा कसा लागला?
प्रियंका सिंहचे गुन्हेगारी कृत्य वाढत चालले होते. विशेष म्हणजे ती पोलिसांच्या रडारवर तेव्हा आली जेव्हा तिने रांचीतल्या एका मोठ्या उद्योगपतीला धमकी दिली. संबंधित उद्योगपतीचा रांचीच्या राजकारणातही दबदबा आहे. त्यामुळे पोलिसांनी तिचा काटा काढायचं ठरवलं. पोलिसांनी साफळा रचला आणि तिची सविस्तर माहिती काढली.
अखेर पोलिसांकडून प्रियंकाला अटक
आरोपी प्रियंका ही सहजासहज पोलिसांच्या हाती लागणं कठीण होतं. कारण ती विद्यार्थींनी असल्याचं नाटक करुन एका महिला वसतीगृहात वास्तव्यास होती. तिथूनच ती तिच्या गुन्हेगारी कामांसाठी सूत्रे हलवायची. अखेर पोलिसांना त्याबाबत दागेदोरे मिळाले. पोलिसांनी वसतीगृहात छापा टाकून तिला अटक केली. आरोपी प्रियंका रांची शहरातील अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी असल्याचं समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तिची चौकशी सुरु आहे (Jailed gangster girlfriend running cartel from girls hostel threatens businessmen).
हेही वाचा : Fact Check | मॉलबाहेर पोलिसाचा दाम्पत्यावर गोळीबार, व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय?