Ashadeep hostel video : मुलींना नग्न करुन व्हिडीओ काढतात, रक्षकच भक्षक कसे बनले, श्वेता महाले कडाडल्या
महिला वसतिगृहात तरुणींना कपडे (Jalgaon Girls Stripped Ashadeep hostel) काढून नाचायला लावल्याप्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
जळगाव : महिला वसतिगृहात तरुणींना कपडे (Jalgaon Girls Stripped Ashadeep hostel) काढून नाचायला लावल्याप्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आशादीप वसतिगृहात मुलींबाबत झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीस सुरुवात झाली आहे. महिला अधिकाऱ्यांच्या समितीने तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे (Trupti Ghodmise) यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीने तक्रारदार महिलेसह संबधितांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. लवकरच याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येणार असल्याची माहिती घोडमिसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. (Jalgaon Ashadeep Girls Hostel Issue)
जळगाव शहरातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी आणि इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याबाबतची तक्रार सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. पीडित महिलांनी दिलेल्या माहितीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
विधानसभेत पडसाद
या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील याप्रकरणी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करुन त्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. चार महिल अधिकाऱ्यांच्या या समितीमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे या अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत डॉ. कांचन नारखेडे, पोलीस अधिकारी कांचन काळे यांच्यासह अन्य एका महिला डॉक्टरचा समावेश आहे.
आमदार श्वेता महाले आक्रमक
दरम्यान, भाजप आमदार श्वेता महाले यांनीही याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “जळगावमध्ये अतिशय निंदनीय घटना घडली आहे. जळगावच्या आशादीप वसतिगृहात अशी घटना घडणे खूप चुकीचं आहे. कर्मचाऱ्यांकडून मुलींना कपडे काढून नाचायला सांगतात हे अतिशय निंदनीय आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. हे कृत्य करायला नकार देणाऱ्या महिलांना मारझोड केली जाते. या आरोपींवर कडक कारवाई करावी आणि सरकारने दखल घ्यावी. आपली सुरक्षा करणाऱ्या लोकांकडून अशी घटना होते ते खूप दुर्दैवी आहे” असं आमदार श्वेता महाले म्हणाल्या.
कोण आहेत आमदार श्वेता महाले?
श्वेता महाले या बुलडाण्यातील चिखली विधानसभेच्या आमदार आहेत
भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्या
2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा पराभव केला
2004 नंतर चिखली मतदारसंघात पहिल्यांदाच भाजप उमेदवाराचा इथे विजय झाला होता
श्वेता महाले या ल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती होत्या
त्यांना भाजपने 2019 मध्ये विधानसभेचं तिकीट दिलं होतं
मिळालेल्या संधीचं सोने करुन श्वेता महाले विधानसभेत पोहोचल्या
VIDEO : आमदार श्वेता महाले काय म्हणाल्या, पाहा –
जळगावातील नेमकं प्रकरण काय आहे?
जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. (Police allegedly made Girls Dance in Jalgaon Women’s Hostel)