शीतपेयाच्या कंपनीत दारुची निर्मिती, आयुर्वेदिक कंपनीतील फंडा पाहून अधिकारी चक्रावले

Jalgaon Crime News: जळगाव येथील मंदार आयुर्वेदिक प्रॉडक्ट या कंपनीत शीतपेय बनविण्याचा उद्योग दाखवला. परंतु शीतपेयाच्या नावाखाली बनावट देशीदारू बनवून त्याची बाजारात बेकायदेशीररित्या विक्री होत होती.

शीतपेयाच्या कंपनीत दारुची निर्मिती, आयुर्वेदिक कंपनीतील फंडा पाहून अधिकारी चक्रावले
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 12:00 PM

उन्हाळ्यात शीत पेयांना चांगली मागणी असते. यामुळे शीत पेय बनवणाऱ्या कंपन्यांची उलाढाल या काळात चांगली होती. परंतु जळगावात वेगळीच घटना घडली. जळगावातील एमआयडीसीत एक आयुर्वेदिक कंपनी आहे. या कंपनीत शीतपेयाचे उत्पादन होत असल्याचे म्हटले जात होते. परंतु कंपनीत शीतपेयाच्या नावाखाली बनावट देशीदारू बनविण्याचा कारखाना सुरु झाला. राज्य उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती मिळाली. या प्रकाराने अधिकारीही चक्रावले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ४ एप्रिल रोजी मध्यरात्री अडीच वाजता छापा टाकून अंदाजे ५० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात ५ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

मंदार आयुर्वेदिकमध्ये असे ‘उद्योग’

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या निवडणुकीचा फायदा घेत एमआयडीसी भागात असलेल्या के-१० येथील मंदार आयुर्वेदिक प्रॉडक्ट या कंपनीत शीतपेय बनविण्याचा उद्योग दाखवला. परंतु शीतपेयाच्या नावाखाली बनावट देशीदारू बनवून त्याची बाजारात बेकायदेशीररित्या विक्री होत होती. याबाबत गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने शनिवारी ४ मे रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास मंदार आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनीत छापा टाकला.

कर्मचाऱ्यांनी दार बंद केले, पण…

दरम्यान, पोलिसांना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहून कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आतून दार बंद करून घेतले होते. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी बंद असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश करत बनावट देशीदारू बनवण्याचा कारखाना उध्वस्त केला. या ठिकाणी दारू पॅकिंगसाठी लागणारे रिकामी बॉटल्स, 32 बॅरेल तयार असलेली दारू, मशीनरी सामान आणि ५ जणांना पोलिसांनी घेतले आहे. हा मुद्देमाल जवळपास ५० लाखाहून अधिक असल्याचे समोर आले आली आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान या ठिकाणाहून बनावट देशीदारू हा कोणत्या ठिकाणी गेला आहे, त्या ठिकाणाची देखील चौकशी करून जिल्ह्यात वितरण करण्यात आलेला मुद्देमाल मागवण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहेत. या प्रकरणात जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.