जळगाव पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न, ग्रामस्थ प्रचंड आक्रमक

जळगावच्या भडगाव तालुक्यातील अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असताना आता पारोळा तालुक्यातूनही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न, ग्रामस्थ प्रचंड आक्रमक
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 11:58 PM

जळगाव | 11 ऑगस्ट 2023 : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिलेली नाही, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. भडगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचर आणि हत्येची घटना ताजी असताना आता पुन्हा तशाच घटनेसारखी घटना घडली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात नुकतंच एका पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर आता पुन्हा अत्याचाराची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही, अशी परिस्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पीडित मुलगी नैसर्गिक विधीसाठी नदीकाठी गेले असताना आरोपीने तिच्यासोबत गैरकृत्य केलं. तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करून दगडाने डोक्यावर वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर पीडीत अल्पवयीन मुलीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पारोळा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करत आरोपीला तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी केली. पोलिसांकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील एका गावात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केला. आरोपी मुलीच्या डोक्यावर दगड मारून आणि दोरीने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

याप्रकरणी संशयित तरुण बारक्या उर्फ अशोक मंगा भिल याच्या विरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला तात्काळ अटक करून फाशी द्यावी, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी पारोळा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....