धक्कादायक, ९ महिन्यांच्या बाळासह पत्नीचा गळा चिरुन पतीने जीवन संपवले

Crime News: विशाल झनके हा मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे राहतो. त्याचे सासर देऊळगाव गुजरी येथे आहे. १२ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याच्या सासराच्या घरात कोणी नव्हते. त्यावेळी विशाल झनके आला. पत्नी अन चिमुकलीच्या क्रूरपणे हत्या करुन फरार झाला.

धक्कादायक, ९ महिन्यांच्या बाळासह पत्नीचा गळा चिरुन पतीने जीवन संपवले
घटनास्थळी पोलिसांचे पथक पोहचले.
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 7:38 AM

पती अन् पत्नीमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर पत्नी नऊ महिन्यांच्या मुलीला घेऊन माहेरी गेली. त्या महिोलेचा पती त्या ठिकाणी पोहचला. घरात कोणीच नाही, हे पाहून पोटाच्या मुलीची आणि पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. त्यानंतर पतीने स्वत:देखील आत्महत्या केली. अंगावर शहारे आणणारी ही घटना जळगाव जिल्ह्यात घडली. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. विशाल मधुकर झनके असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. प्रतिभा झनके आणि दिव्या झनके या मुली आहेत.

क्रूरपणे केली हत्या

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे ही घटना घडली. ९ महिन्यांच्या बाळासह पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून विशाल झनके फरार झाला. विशाल झनके हा मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे राहतो. त्याचे सासर देऊळगाव गुजरी येथे आहे. १२ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याच्या सासराच्या घरात कोणी नव्हते. त्यावेळी विशाल झनके आला. पत्नी आणि नऊ महिन्याच्या मुलीची निर्घृण हत्या केल्यानंतर तो मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे आला. त्या ठिकाणी त्याने स्वत:चे जीवन संपवले. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंदवण्यात आला आहे. या हत्याकांडामुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. विशाल झनके याने हे कृत्य का केले? याची कारण अजून स्पष्ट झाले नाही.

हे सुद्धा वाचा

मोठ्या मुलीस ठेवले घरी

खुनाची घटना घडली ते ठिकाण गावापासून लांब होते. यामुळे पोलीस आणि गावकऱ्यांना या घटनेची माहिती लवकर मिळाली नाही. विशाल झनके सासरी आला तेव्हा मोठी मुलगी प्रिया हिला घरी ठेऊन आला. देऊळगाव गुजरीत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. प्रतिभा हिच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हा मन हेलावणारा होता. पोलिसांनी मृतदेह जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन केले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.