जळगाव : कोरोना लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची बाईक चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घ़डली. (Jalgaon Theft stole Bike from Corona Vaccination center Parking Get arrested)
नेमकं प्रकरण काय?
जळगावातील महाबळ रोडवरील संभाजी नगर येथे राहणारे सुरेश देशपांडेंनी 11 जूनला कोरोना लसीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार 11 जूनला सकाळी 7 वाजता शहरातील छत्रपती शाहू महाराज लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेले होते. सुरेश देशपांडे दुचाकी घेऊन लस घेण्यासाठी गेले होती. त्यावेळी त्यांनी लसीकरण केंद्रासमोर दुचाकी पार्क केली.
पोलिसात तक्रार
मात्र त्याच वेळी काही अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी लांबवली. लस घेऊन बाहेर आलेल्या देशपांडेंना आपली गाडी न दिसल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. देशपांडे यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोघांना अटक
यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पोलिस संशयित आरोपींचा शोध घेत होते. नुकतंच पोलिसांना या प्रकरणातील आरोपी हे तांबापुऱ्यातील असल्याचे निष्पन्न झाले होते. यानुसार सोमवारी 14 जूनला पोलिसांनी दोन जणांना अटक केली. शाहरुख जहूर खाटीक (25) आणि फारुख शेख मुस्तफा (32) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. या दोघांकडून चोरीच्या पाच जप्त करण्यात आल्या आहेत.
शाळेत किती शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य? गाईडलाईन्स जारी https://t.co/WnWV4FCfFy #school #Guidelines
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 15, 2021
(Jalgaon Theft stole Bike from Corona Vaccination center Parking Get arrested)
संबंधित बातम्या :
‘भारी’ गावाजवळ ‘हाय प्रोफाईल’ जुगार, तब्बल 81 लाखांचा मुद्देमाल जप्त, 19 अट्टल जुगारी गजाआड