RJ Simran : लाखो फॉलोअर्स, जीवन संपवल्यानंतर RJ सिमरनचा पहिला इंटरव्यू व्हायरल

RJ Simran Video Viral : मिर्ची सिमरन, जम्मूची धड़कन आणि आवाजाची जादूगर रेडियो जॉकी सिमरन सिंहने गुरुवारी रात्री आयुष्य संपवलं. तिने इतकं टोकाच पाऊल का उचललं? याची चौकशी सुरु आहे. आता सिमरनचा पहिला इंटरव्यू व्हायरल झाला आहे.

RJ Simran : लाखो फॉलोअर्स, जीवन संपवल्यानंतर RJ सिमरनचा पहिला इंटरव्यू व्हायरल
RJ Simran
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 3:09 PM

गुरुग्राम येथील रेडियो जॉकी सिमरनच्या सुसाइड केसने सगळ्या देशाला धक्का बसला आहे. प्रत्येक जण हैराण आहे, असं काय झालं की, सिमरनने आपलं आयुष्यच संपवून घेतलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. सिमरनला वर्ष 2021 मध्ये रेडिओ मिर्चीमध्ये पहिली नोकरी लागली होती. तिने आयुष्यातला पहिला शो होस्ट करताना इंटरव्यू दिला होता. या इंटरव्यूमध्ये सिमरन काय-काय बोललेली? जाणून घेऊया.

RJ सिमरनचा पहिला इंटरव्यू समोर आलाय. रेडिओ मिर्चीवर पहिला शो होस्ट केल्यानंतर तिने हा इंटरव्यू दिलेला. या इंटरव्यूमध्ये सिमरन खूप आनंदात होती. तिने या इंटरव्यूमध्ये तिचा रेडिओ जॉकी बनण्याचा अनुभव शेअर केलेला. पहिला शो होस्ट करण्याआधी काय-काय शिकावं लागलं? सोबतच पुढची प्लानिंग या बद्दल सिमरनने मुलाखतीत माहिती दिलेली. हा इंटरव्यू सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तेव्हा लक्षात आलं की…

जम्मूच्या सेंट्रल युनिवर्सिटीमधून पास आऊट होताच एका आठवड्यात रेडिओ मिर्चीमध्ये नोकरी लागल्याच सिमरन या इंटरव्यूमध्ये म्हणाली होती. “मला सुरुवातीपासूनच रेडिओ जॉकी बनायचं होतं. फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट होता. जसं मला रेडिओ मिर्चीकडून ऑफर लेटर मिळालं, आई-बाबांना माझा अभिमान वाटला. आधी मला असं वाटायच रेडिओ जॉकी बनणं फार कठीण नाही. पण मी जॉईंन झाले, काम पाहिलं, तेव्हा लक्षात आलं की, यात खूप मेहनत करावी लागते” असं सिमरन या इंटरव्यूमध्ये म्हणालेली.

मी आधीच ठरवलेलं RJ बनायचं

“आम्हाला इथे रायटिंग करावी लागते आणि सॉफ्टवेअर ऑपरेट करणं सुद्धा शिकावं लागतं. मी एक ते दोन महिने ट्रेनिंग घेतली. त्यानंतर पहिला शो होस्ट केला. मी आधीच ठरवलेलं RJ बनायचं. पण माझ्याकडे प्लान बी सुद्धा आहे. मी रेडिओ जॉकीशिवाय दुसरी काम सुद्धा करेन” असं सिमरन म्हणालेली. इंटरव्यूमध्ये सिमरन शो बद्दल म्हणालेली की, ‘गेम्स, एंटरटेनमेंट आणि फन चिट चॅट्स प्रेक्षकांना डिलिवर करेन’

एक कोठी भाड्यावर घेतली

सोमवार ते शनिवार सिमरनचा ‘मिर्ची सिमरन’ शो यायचा. तो खूप लोकप्रिय झालेला. आधी हा शो RJ श्तेतिमा होस्ट करायची. जी सिमरनची आवडची रेडिओ जॉकी होती. तिनेच सिमरनची RJ साठी मुलाखत घेतलेली. त्यानंतर सिमरन शो ची होस्ट झाली. तिने RJ श्तेतिमाच्या अंडर काही वर्ष काम केलं. त्यानंतर जम्मू सोडून गुरुग्रामला आली. तिने मित्रांसोबत गुरुग्रामच्या सेक्टर-47 मध्ये एक कोठी भाड्यावर घेतली. मग, इथेच राहून ती फ्रिलांसिंगची काम करायची.

जम्मूची धडकन

छोट्याशा वयात सिमरन खूप फेमस झाली. तिच्या आवाजाची जादू अशी होती की, लोक तिला जम्मूची धडकन बोलायचे. ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर होती. इन्स्टाग्रामवर तिचे 7 लाख फॉलोअर्स आहेत. सिमरनने 13 डिसेंबरला इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.