‘मुलगी कमावते, तू आरामात बसून खातोस?’ बापाने लेकीचं कुंकू पुसलं, पाय कापून जावयाची हत्या

माझी मुलगी केरळमध्ये मेहनत करुन कमावते आणि तू घरी बसून आयता जेवतोस, अशा शब्दात सासऱ्याने जावयाला फटकारले. दोन वर्षांपासून मुलगी घरी न आल्याने सासऱ्याचा पारा चांगलाच चढला होता.

'मुलगी कमावते, तू आरामात बसून खातोस?' बापाने लेकीचं कुंकू पुसलं, पाय कापून जावयाची हत्या
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 1:54 PM

रांची : झारखंडमधील साहेबगंज जिल्ह्यातील बोरीओ पोलीस ठाण्याअंतगर्त येणाऱ्या रंचरा गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याच मुलीचं कुंकू पुसलं. सासऱ्याने जावयाचा पाय कापून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीला नोकरीसाठी झारखंडहून केरळला पाठवल्याच्या रागातून सासऱ्याने घरजावई म्हणून राहणाऱ्या तरुणाची हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच बोरीओ पोलीस ठाण्याचे प्रभारी जगन्नाथ पान यांनी पथकासह रंचरा गावात पोहोचून आरोपी सासरा हडमा किस्कू याला अटक केली. जावयाचे कापलेले पाय ताब्यात घेत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी साहेबगंज सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील साहेबगंज जिल्ह्यातील रंचरा गावातील रहिवासी असलेला आरोपी सासरा हडमा किस्कू याने आपली मुलगी नानामय किस्कू हिचा विवाह बोरीओ संथाली गावातील सफल हंसदा याच्याशी लावला होता. तो घरजावई म्हणून त्यांच्या सासरी रंचरा येथेच राहत होता. त्याने पत्नी नानामय किस्कू हिला दोन वर्षांपूर्वी पैसे कमवण्यासाठी केरळला पाठवले होते.

लेकीला केरळला पाठवल्याचा राग

केरळला गेल्यापासून नानामय एकदाही घरी परतली नव्हती. याचा राग मनाात धरुन सासरा हडमा किस्कू याने जावयाची खरडपट्टी काढली. माझी मुलगी केरळमध्ये मेहनत करुन कमावते आणि तू घरी बसून आयता जेवतोस, अशा शब्दात सासऱ्याने जावयाला फटकारले. दोन वर्षांपासून मुलगी घरी न आल्याने सासऱ्याचा पारा चांगलाच चढला होता.

पाय कापले, डोक्यात धारदार शस्त्राने वार

या रागातून त्याने जावई सफल हंसदा (वय 35 वर्षे) याचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केला. इतक्यावर तो थांबला नाही. त्याच्या मनात इतका संताप होता, की जावयाचे पाय कापेपर्यंत त्याचं क्रौर्य वाढलं. या घटनेच्या संदर्भात बोरीओ पोलिस स्टेशनचे प्रभारी जगन्नाथ पान यांनी सांगितले की, तपासादरम्यान आरोपी हडमा याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात ‘फुकट बिर्याणी न दिल्याच्या रागातून हॉटेल मॅनेजरवर केला कोयत्यानं हल्ला

महिलेचा छतावरुन पडून मृत्यू झाल्याचा बनाव, चार वर्षांच्या मुलांनी सांगितलं बाबांनीच आईला ढकललं

गोड बोलून तरुणाला जाळ्यात अडकवलं, मागितली एक लाखाची खंडणी, औरंगाबादध्ये हनी ट्रॅपची केस!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.