विवाहित मामाने अल्पवयीन भाचीला फूस लावून पळवले, पोलिसांनी दोन दिवसांत पकडले
झारखंडची (Jharkhand) उपराजधानी दुमका येथे एक संतापजनक घटना घडली आहे. येथे आजीला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीच्या मामाने तिला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी मामाला अटक केलीये. त्याचबरोबर मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ही घटना पुढे आल्यानंतर सार्वजनिक लाजेमुळे कुटुंबीय काहीही बोलणे टाळत आहेत.
रांची : झारखंडची (Jharkhand) उपराजधानी दुमका येथे एक संतापजनक घटना घडली आहे. येथे आजीला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीच्या मामाने तिला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी मामाला अटक केलीये. त्याचबरोबर मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ही घटना पुढे आल्यानंतर सार्वजनिक लाजेमुळे कुटुंबीय काहीही बोलणे टाळत आहेत.
घटना आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दुमका जिल्ह्यातील जारमुंडी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे एक तरुण आपल्याच अल्पवयीन भाचीसह फरार झाल्याची माहिती होती. आरोपी मामा विवाहित असून त्याला मुलेही आहेत. ही घटना आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपींना अटक केली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मामाला अटक केली आहे. तर, अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
अल्पवयीन मुलगी तिच्या पालकांसह बंगळुरु येथे राहते. ती मामाच्या घरी भेटायला आली होती. मामाची तिच्यावर वाईट नजर होती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी तो भाचीसह पळून गेला होता. जारमुंडीचे पोलीस निरीक्षक नवल किशोर सिंग यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा टाकून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आणि मामाला अटक केलं.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे. सध्या पोलिसांनी चौकशीनंतर आरोपीला कारागृहात पाठवले आहे. त्याचबरोबर अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच पुढील तपास करण्यात येईल, अशी माहिती आहे.
Jharkhand Crime | महिलेची हत्या, शिर धडापासून वेगळं करुन जंगलात फेकलं, झारखंडच्या बोकारोमध्ये खळबळhttps://t.co/E9NTSfxrEd#JharkhandCrimeNews #Crime #Murder
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 24, 2021
संबंधित बातम्या :
वर्चस्ववादातून रक्तचरित्र, उद्योगनगरी नाशिकमध्ये खुनामागून खून; डोक्यात दगड घालून तरुणाला संपवले