Mukesh Chandrakar Death : लिवरचे 4 तुकडे, पाच बरगड्या तोडल्या, ह्दय फाटलं, क्रूरतेने पत्रकाराची हत्या
Mukesh Chandrakar Death : पत्रकाराच्या हत्येच एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलय. पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी माहिती दिल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सर्वच हादरले. छळून, अत्यंत यातनादायी असा मृत्यू देण्यात आला.
पत्रकार मुकेश चंद्राकर हत्याकांड प्रकरणात फरार मुख्य आरोपी सुरेश चंद्राकरला SIT टीमने हैदराबादमधून अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी सुरेश हैदराबादमध्ये आपल्या ड्रायव्हरकडे लपला होता. तो सतत आपलं लोकेशन बदलत होता. या दरम्यान पत्रकार मुकेश चंद्राकरचा प्रारंभिक पोस्टमार्ट रिपोर्ट आला आहे. छत्तीसगडच्या बीजापूरमधील हे हादरवून सोडणारं प्रकरण आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, मुकेश चंद्राकरची अत्यंत निदर्यतेने क्रूर हत्या केली. त्याला खूप छळण्यात आलं. पाच बरगडल्या तोडल्या. धारदार शस्त्राने पोटावर अनेक वार केले. त्यामुळे लिवरचे चार तुकडे झाले. छातीवरही अनेक वार केले. पोस्टमार्टमच्यावेळी ह्दय फाटलेलं आणि मान तुटलेली आढळून आली.
डॉक्टरांनुसार मृतदेहाला पाहून असं वाटलं की, आधी मुकेशच्या डोक्यात पाठीमागून रॉडने प्रहार केला. डोक्यावर चार इंचाचा घाव होता. डोक्याच्यावर आणि बाजूला दोन वार झाले. छातीवर पाच इंचाचा खोलवर वार होता. मृतदेह पाहून असं वाटतय की मृत्यूनंतरही त्याला निदर्यतेने मारण्यात आलं. पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी स्थानिक पत्रकारांना ही माहिती दिली, तेव्हा ते सुद्धा भयभयीत झाले. 12 वर्षाच्या करिअरमध्ये इतकी भयानक हत्या बघितलेली नाही, असं डॉक्टर म्हणाले.
सेप्टिक टँकमध्ये मृतदेह सापडला
छत्तीसगडचा पत्रकार मुकेश चंद्राकर हत्याकांडाचा मास्टरमाइंड सुरेश चंद्राकरला पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. आरोपी ठेकेदाराला पकडण्यासाठी SIT ची स्थापना केली होती. 1 जानेवारीला बेपत्ता झालेल्या मुकेशचा 3 जानेवारीला सेप्टिक टँकमध्ये मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणात आधीच 3 आरोपी रितेश, महेश आणि अन्य एकाला अटक केली आहे.
शरीरावर 9 जखमा
मुकेशच्या शरीरावर 9 जखमा आढळून आल्या. प्रत्येक बाजूने त्याच्यावर हल्ला झाला, असं दिसतय. जे शस्त्र वापरलं, ते अजून मिळालेलं नाही. आरोपी सुकेशला घेऊन SIT ची टीम बीजापूरला पोहोचली आहे. पोलीस आरोपी सुकेशचा रिमांड मिळवून चौकशी करण्याची तयारी करत आहेत.