Jalgaon Crime : पाचोऱ्यातील “त्या” पत्रकाराला बेदम मारहाण, मारहाणीत पत्रकार संदीप महाजन किरकोळ जखमी

जळगावातील बालिका हत्याकांडवरुन आमदार आणि पत्रकारामध्ये जुंपलेली पहायला मिळते. पत्रकाराला शिवीगाळनंतर मारहाणीवरुन प्रकरण चांगलेच तापले आहे.

Jalgaon Crime : पाचोऱ्यातील त्या पत्रकाराला बेदम मारहाण, मारहाणीत पत्रकार संदीप महाजन किरकोळ जखमी
संपत्तीसाठी स्वतःच्या आईला विष पाजले
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 11:18 AM

जळगाव / 10 ऑग्सट 2023 : जळगावातील बालिका हत्याकांड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केल्याप्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांना अज्ञातांनी मारहाण केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. मात्र आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप पत्रकरा महाजन यांनी केला आहे. दरम्यान, आपल्यावर किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कितीही हल्ले झाले तरी आपण आपला लढा सुरुच ठेवणार असल्याचं संदीप महाजन यांनी म्हटलं आहे. या मारहाणीत महाजन किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी महाजन यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याआधी महाजन यांना फोनवरुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच ही मारहाणीची घटना घडली.

जळगावमधील पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात 8 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार आणि हत्येची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरुन संवाद साधत त्यांचे सांत्वन केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सांत्वनाबाबत पत्रकार संदीप महाजन यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर किशोर पाटील यांनी महाजन यांना फोनवरवरुन शिवीगाळ केली होती.

ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी आमदार भावावर भडकल्या

पाचोऱ्याला सुसंस्कृत राजकारणाचा इतिहास तो आमदारांनी जपावा, मतदार हे लोकप्रतिनिधीचे अनुकरण करतात, असे सांगत पत्रकार मारहाण प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार भावावर भडकल्या आहेत. आमदार किशोर पाटलांच्या व्हायरल क्लिपवरून बहीण वैशाली सूर्यवंशी संतप्त झाल्या आहेत. यामुळे त्यांनी शिंदे गटाचे आमदार आणि भाऊ किशोर पाटलांचे कान टोचले आहेत. ही गुंडगिरी खपवून घेणार नाही, असाही टोला वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांचं नाव न घेता हाणला आहे. यापुढे उद्धव ठाकरेंवरही टीका कराल तर खबरदार असा इशाराही पुढे वैशाली सूर्यवंशी यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.