धक्कादायक, जुन्या बंद पडलेल्या हॉस्टेलमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे बनवण्यात आले आहेत. मात्र, तरीही महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. आता पुन्हा एकदा ज्यूनियर महिला डॉक्टरसोबत बलात्काराची घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वी कलकत्ता येथे सुद्धा असाच प्रकार घडला होता.

धक्कादायक, जुन्या बंद पडलेल्या हॉस्टेलमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार
क्राईम न्यूजImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 10:21 AM

काही महिन्यांपूर्वी कलकत्ता येथील आरजी कर रुग्णालयातील बलात्कार आणि हत्येच्या घटनेने सगळ्या देशात संतापाची लाट उसळली होती. देशभरात या घटनेविरोधात विरोध प्रदर्शन, आंदोलनं झाली होती. एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे. एका ज्यूनियर महिला डॉक्टरवर कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. एका जुन्या बंद पडलेल्या हॉस्टेलमध्ये सहकाऱ्यानेच महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मध्य प्रदेशच्या ग्वालियरमधलं हे प्रकरण आहे.

अधिकाऱ्याने सांगितंल की, गजराराजा मेडिकल कॉलेज कॅम्पसच्या आत बंद पडलेल्या एका हॉस्टेलमध्ये ही घटना घडली. पीडित मुलीने मध्य प्रदेशच्या कम्पू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. शहर पुलिस अधीक्षक (सीएसपी) अशोक जादोन यांनी सांगितलं की, पीडित मुलीला परिक्षा द्यायची होती. ती कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होती.

इथे कोणाचा फारसा वावर नसतो

या प्रकरणातील आरोपी सुद्धा एक डॉक्टरच आहे. तो पीडितेसोबत शिक्षण घेत आहे. आरोपीने पीडित मुलीला जुन्या हॉस्टेलच्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावलं होतं. हे हॉस्टेल आता बंद असतं. एक निर्जन स्थळ बनलं आहे. इथे कोणाचा फारसा वावर नसतो. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलगी तिथे आल्यानंतर ज्यूनियर डॉक्टरने तिला धमकावलं. तिच्यावर बलात्कार केला. आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. पुढील तपास सुरु आहे.

मृतदेह सेमिनार रुममध्ये आढळलेला

मागच्यावर्षी कलकत्यात सुद्धा अशीच घटना घडली होती. इथे 9 ऑगस्टला आरजी कर हॉस्पिटलमध्ये एका लेडी डॉक्टरचा मृतदेह सेमिनार रुममध्ये आढळला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बलात्कार आणि हत्येची पृष्टी करण्यात आली होती. सुरुवातीला कोलकता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर कलकत्ता हाय कोर्टाने स्थानिक पोलिसांच्या तपासावर चिंता व्यक्त करत ही केस सीबीआयकडे सोपवली.

सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.