Kalicharan: कालीचरण बाबाला पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर, 25 हजारांच्या जातमुचलक्यावर मिळाला जामीन
धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कालीचरण बाबा विरोधात पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करीत कालीचरण बाबाला बुधवारी छत्तीसगडमधून पुणे पोलिसांनी ताब्यात घेत पुण्यात आणलं होतं.
पुणे : महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्या केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या कालीचरण बाबाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने कालीचरण बाबाला जामीन मंजूर केला आहे. मात्र कालीचरणची पुणे पोलिसांकडून सुटका झाली असली तरी त्याला रायपूर पोलिसांकडे देणार आहे. रायपूर येथील न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला होता. त्यामुळे आता पुणे पोलीस आता कालीचरणला रायपूर पोलिसांकडे सुपूर्द करणार आहे.
छत्तीसगडमधून पुणे पोलिसांनी बाबाला ताब्यात घेतले
धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कालीचरण बाबा विरोधात पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करीत कालीचरण बाबाला बुधवारी छत्तीसगडमधून पुणे पोलिसांनी ताब्यात घेत पुण्यात आणलं होतं. त्यानंतर बाबाला पुणे सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने कालीचरण बाबाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
पुण्यातील नातूबागेतील एका कार्यक्रमात गांधींजींबाबत वादग्रस्त विधान केले होते
पुण्यातील नातू बागेत 19 डिसेंबर रोजी आयोजित एका कार्यक्रमात कालीचरण याने महात्मा गांधीजी विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी कालिचरण आणि इतर आरोपींनी भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील फरार आरोपी मिलिंद एकबोटे, रमाकांत एकबोटे, दिपक नागपुरे, मोहन शेटे आणि कॅप्टन दिगेंद्र कुमार यांचा शोध घेण्यासाठी कालीचरणची कोठडी आवश्यक आहे. तसेच कालीचरण बाबाचे व्हॉईस सँपलही घ्यायचे असून बाबाची चौकशीही करायची असल्याचे पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार पुणे सत्र न्यायालयाने कालीचरण बाबाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कल्याणमध्येही गुन्हा दाखल
दरम्यान, त्याआधी 10 डिसेंबर रोजी कल्याणमध्ये एका सामाजिक संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमातही महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात कालीचरण बाबा विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोळसेवाडी पोलीसही याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. (Kalicharan Maharaj granted bail by Pune Sessions Court)
इतर बातम्या
ISIS Connection : मालवणीतील दोघांना 8 वर्षांचा तुरुंगगवास व दहा हजार दंड; एनआयए कोर्टाचा निकाल
विकृत नवरा! नकली दातांनी प्रायवेट पार्टसह शरीराचे चावे घ्यायचा, बायकोची पोलीस ठाण्यात धाव