दोघे मित्र दारु पित बसले होते, काही वेळाने मित्रानेच मित्राला…, न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा

दोघे मित्र एकत्र दारु पित बसले होते. दारु पिता पिता त्यांच्या गप्पा सुरु होत्या. अचानक दोघांमध्ये वाद सुरु झआला. मग या वादाने भयंकर रुप घेतले.

दोघे मित्र दारु पित बसले होते, काही वेळाने मित्रानेच मित्राला..., न्यायालयाने सुनावली 'ही' शिक्षा
मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 9:59 AM

डोंबिवली : आपले म्हणणे ऐकत नसल्याच्या रागातून दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून मित्रानेच मित्राची हत्या केली. याप्रकरणी अखेर न्यायलायाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे. आरोपीला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. कचरे यांनी ही शिक्षा सुनावली. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या जुलै 2016 मध्ये ही हत्याकांडाची घटना घडली होती. विनोदकुमार चौधरी असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे, तर जनार्दन वर्मा उर्फ चौधरी असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दारु पित बसले असताना दोघांमध्ये वाद झाला

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेच्या घरी विनोदकुमार चौधरी आणि जनार्दन हे दोघे जुलै 2016 च्या रात्री दारू पीत बसले होते. आपले म्हणणे ऐकत नसल्याच्या रागातून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून देत मित्राची हत्या केली होती. यावेळी विनोदकुमार चौधरी आणि जनार्दन या दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर झटापटीत होऊन विनोदकुमार जनार्दनच ऐकत नसल्याने संतप्त झालेल्या जनार्दन याने विनोदकुमारला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. यात गंभीर जखमी झालेल्या विनोदकुमारचा जागीच मृत्यू झाला.

कल्याण न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी जनार्दनविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल केले होते. सर्व पुराव्यांच्या आधारे जनार्दन वर्मा उर्फ चौधरी याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. कचरे यांनी शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणात सहायक सरकारी वकील रचना भोईर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पोलीस हवालदार ए. आर. गोगरकर यांनी मदत केली.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.