मुलासमोर व्यावसायिकाचं अपहरण, वडिलांना वाचवण्यासाठी गाडीचा पाठलाग, अवघ्या चार तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या
डोंबिवलीत पार्किगच्या जुन्या वादातून एका व्यासायिकाचं अपहरण करुन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. Dombivali kidnapping of Businessman
कल्याण डोंबिवली: पार्किगच्या जुन्या वादातून एका व्यासायिकाचं अपहरण करुन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना डोंबिवलीत समोर आली आहे. मानपाडा पोलीस वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला नाही तर व्यावसायिकाचा जीव गेला असता. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी सहा पैकी तीन आरोपीना अटक केलीय यामध्ये एका शिवसेना पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती आहे. पोलीस आता इतर आरोपींचा शोध घेत आहेत. (Kalyan Dombivali Manpada Police Arrested three Person for kidnapping of Businessman)
जुन्या वादातून अपहरण
डोंबिवली एमआयडीसीत रणजीत झा यांची फॅक्टरी आहे. ते दररोज दिवा बी आर नगर परिसरात असलेल्या आपला जागेवर मंदिरात पूजेसाठी जातात . काही दिवसापूर्वी गाडी पार्किगवरुन शरद शेट्टे या व्यक्तीच्या रणजीत सोबत वाद झाला बरोबर वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरुन शरद शेट्टे यांनी रणजीत याला धमकी दिली होती.
अपहरणाचा थरार
शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास रणजीत झा फॅक्टरी बाहेर आले असता एक पांढऱ्या रंगाची कार उभी होती. या कारमधून काही तरुण उतरले. रणजीत यांना बेदम मारहाण करत कारममध्ये कोंबळे. हा प्रकार रणजीत यांचा मुलाने पाहिला. त्याने वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी गाडी सुरु केली. वडिलांना वाचवताना झा यांचा मुलगा कारसोबत फरफटत गेला. या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली.
तीन आरोपींचा शोध सुरु
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक दादा हरी चौरे, पोलीस अधिकारी श्रीकृष्ण गोरे यांनी तपास सुरु केला. अवघ्या चार तासाच गोरे यांच्या पोलिसांच्या पथकाने आरोपींना शोधून काढले. पोलीस जेव्हा आरोपींकडे पोहचले. त्यावेळी रणजीत झा यांची स्थिती खराब होती. बेदम मारहाण केल्याने ते अर्धमेले झाले होते. वेळेत पोलीस पोहचल्याने त्यांचा जीव वाचला. धक्कादायक म्हणजे या अपहरणाच्या घटनेत शिवसेना पदाधिकारी सुद्धा सामील होता. सध्या जखमी रणजीत आणि त्यांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेना पदाधिकारी समीर मोरे, शरद शेट्टे आणि अन्य एकाला अटक केली आहे. पोलीस अन्य तीन आरोपींच्या शोधात आहेत.
नोकरदारांना फुकटात मिळते 7 लाखांची सुविधा, कधी आणि कसे पैसे मिळू शकतात? https://t.co/jtCWAPLCIe #EPFO | #EDLI | #employeebenefits
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 8, 2021
संबंधित बातम्या
जावळी-महाबळेश्वरात ‘क्रेटा’मधून हवा, फिल्मी स्टाईल पाठलाग करुन गजा मारणेला सातारा पोलिसांच्या बेड्या
GST Return Filing | दर महिन्याला जीएसटी रिटर्न फाईल करण्याची चिंता मिटली, केंद्र सरकारने नियम बदलला
(Kalyan Dombivali Manpada Police Arrested three Person for kidnapping of Businessman)