15 हजाराच्या बिलासाठी बाऊन्सरकडून फायरिंग, MMRDA चे काम बंद, बाऊन्सर ताब्यात

केबल दुरुस्तीचे बिल दिले गेले नाही म्हणून NRC कंपनीच्या एका बाऊन्सरने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे.

15 हजाराच्या बिलासाठी बाऊन्सरकडून फायरिंग, MMRDA चे काम बंद, बाऊन्सर ताब्यात
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 1:37 PM

कल्याण : MMRDA कडून रस्त्याचे काम सुरु असताना NRC कंपनीला पाणीपुरवठा करणारी केबल तुटली (Kalyan Firing By NCR Company Bouncer). केबल दुरुस्तीचे बिल दिले गेले नाही म्हणून NRC कंपनीच्या एका बाऊन्सरने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या बाऊन्सरला अनिल कुमार सिंगला ताब्यात घेतले आहे (Kalyan Firing By NCR Company Bouncer).

काही दिवसांपासून कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरातील बंद पडलेली NRC कंपनी चर्चेत आहे. NRC कंपनीच्या जागेवर तोडक कारवाईला कंपनीच्या कामगारांनी प्रचंड विरोध केला आहे. जोपर्यंत थकबाकी मिळत नाही. तोपर्यंत कोणतेही काम करु नका असे कामगारांचे म्हणणे आहे. हा वाद सुरु असतानाच दुसरा वाद समोर आला आहे.

मोहन परिसरात MMRDA कडून रस्ता कॉंक्रिटीकरणचे काम सुरु आहे. या कामादरम्यान NRC कंपनीला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपाची केबल तुटली. MMRDA च्या कंत्राटदाराकडून NRC कंपनीला केबल दुरुस्तीचे काम करुन आम्हाला बिल द्या, असे सांगितले गेले. मात्र, या दुरुस्तीच्या कामाच्या बिलावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला.

अधिक बिल लावण्याच्या आरोपानंतर आज सकाळी (23 नोव्हेंबर) जेव्हा MMRDA कडून रस्त्याचे काम सुरु होते. त्या ठिकाणी NRC कंपनीचे बाऊन्सर पोहचले आणि आधी आमचे पैसे द्या, मग काम करा, असे सांगत काम बंद पडले.

या दरम्यान, एक बाऊन्सर अनिल कुमार सिंग याने गोळीबार देखील केला. यात कोणीही जखमी झाले नसून खडकपाडा पोलिसांनी बाऊन्सरला ताब्यात घेतले आहे. मात्र, फक्त 15 हजार रुपयांच्या वादानंतर गोळीबार केल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर सध्या पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Kalyan Firing By NCR Company Bouncer

संबंधित बातम्या :

नागपुरात हत्येचं सत्र थांबता थांबेना; आता पुतण्याने का केली काकाची हत्या?

महिला डॉक्टरने विणलेल्या हनीट्रॅपमध्ये मेडिकल विद्यार्थी अडकला, 70 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

तरुणाचा विवाहितेवर जडला जीव, नकार दिल्यामुळे विहिरीत ढकलून केली हत्या

Gram Panchayat Election | विजयाच्या जल्लोषात कार्यकर्ते भान विसरले, पराभूत उमेदवाराच्या घरासमोर कपबशा फोडल्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.