मित्राकडून अशी अपेक्षा नव्हती, वाढदिवसाला जायचय सांगून महिलेला लॉजवर नेलं आणि….
पार्टीसाठी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीमध्ये जायचं असल्याचं सांगितलं. येथेच वाढदिवस साजरा होणार असल्याच त्याने सांगितलं. कोळसेवाडी परिसरातील लॉजवर घेऊन गेला. येथेच वाढदिवस साजरा होणार असल्याचं पुन्हा त्याने सांगितलं.
(सुनील जाधव) महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी करण्यासाठी कठोर कायदे बनवण्यात आले आहेत, पण त्याचा काही फायदा होत नाहीय. महिलांविरोधात अत्याचाराचे गुन्हे अजूनही घडतच आहेत. कल्याण कोळसेवाडी परिसरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्रानेच आपल्या जवळच्या मैत्रिणीचा विश्वासघात केला. तिने ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानेच दगा दिला. आरोपी पीडित महिलेला, मित्राच्या वाढदिवसाला जायचं आहे सांगून लॉजवर घेऊन गेला. तिथे तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्ती केली. तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्या महिलेला लॉजच्या रूममध्ये डांबून तिथून पळ काढला. लॉज मालकने पीडित महिलेची सुटका केल्यानंतर महिलेने पोलीस ठाणे गाठात आरोपी मित्राविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला. सध्या कल्याण कोळसेवाडी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
पीडित महिला पेशाने हेअर ड्रेसर आहे. आरोपीला ती पूर्वीपासून ओळखते. दोघे चांगले मित्र होते. मंगळवारी सकाळी आरोपीने पीडितेला आपल्या एका मित्राचा वाढदिवस आहे, त्यासाठी आपल्याला पार्टीसाठी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीमध्ये जायचे असल्याचे खोटे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन पीडिता त्याच्याबरोबर कल्याण पूर्वेत गेली. आरोपी पीडितेला कोळसेवाडी परिसरातील लॉजवर घेऊन गेला. येथेच वाढदिवस साजरा होणार असल्याचे पुन्हा त्याने पीडितेला सांगितले.
बाहेरून कुलूप लावलं
काही वेळाने आरोपीने पीडित महिलेला दमदाटी केली. “तू माझ्या जीवनात येणार नसशील, तर मी तुला कुणाचीही होऊ देणार नाही. तु माझ्याशी परत प्रेमसंबंध ठेव” असे बोलून पीडितेला बेदम मारहाण केली. तिला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने पीडितेवर तिच्या मनाविरुध्द जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर लॉजच्या खोलीत डांबले आणि बाहेरून कुलूप लावून तेथून पसार झाला. लॉज चालकाला हा प्रकार कळल्यानंतर त्याने खोली उघडली. त्यावेळी पीडिता खोलीमध्ये असल्याचे आढळून आले. पीडितेने आरोपी विरुध्द कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.