रेल्वे इंजिन चालवतानाचा व्हिडीओ दाखवून लाखोंचा गंडा, ‘असा’ झाला पर्दाफाश

कल्याण पूर्व भागात राहणारे राजेंद्र जैन यांच्या पत्नीला नोकरीची गरज होती. आपल्या पत्नीसाठी ते सोशल मीडियापासून पेपरमध्ये नोकरीच्या जाहिरात शोधत होते. याच दरम्यान ते सोशल मीडियाच्या माध्यमातून उमाशंकर बर्मा यांच्या संपर्कात आले.

रेल्वे इंजिन चालवतानाचा व्हिडीओ दाखवून लाखोंचा गंडा, 'असा' झाला पर्दाफाश
रेल्वे इंजिन चालवतानाचा व्हिडीओ दाखवून लाखोंचा गंडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 7:42 PM

कल्याण : आजकाल कोण कुणाची कशी फसवणूक करेल याचा काही नेम नाही. एक्सप्रेस गाडीचे इंजिन चालविताना व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हिडीओ टाकत रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातल्याचे उघडकीस आली आहे. या घटनेत एका महाठगाने थेट व्हिडीओच दाखवत मोटरमन असल्याची बतावणी केली. आधी व्हिडीओ दाखवायचा मग विश्वास संपादन करायचा. ही आयडिया वापरून त्याने अनेकांची फसवणूक केली आहे.

आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी

याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. उमाशंकर बर्मा असे या भामट्याचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. बर्माने अजून किती जणांना फसवले याचा तपास पोलीस करत असून, त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू केला आहे.

जैन नामक व्यक्ती पत्नीसाठी नोकरीच्या शोधात होते

कल्याण पूर्व भागात राहणारे राजेंद्र जैन यांच्या पत्नीला नोकरीची गरज होती. आपल्या पत्नीसाठी ते सोशल मीडियापासून पेपरमध्ये नोकरीच्या जाहिरात शोधत होते. याच दरम्यान ते सोशल मीडियाच्या माध्यमातून उमाशंकर बर्मा यांच्या संपर्कात आले.

हे सुद्धा वाचा

एक्स्प्रेस चालवताना व्हिडिओ पाहून जैन यांनी केला संपर्क

बर्मा याने सोशल मीडियावर मेल एक्सप्रेस गाडीचे इंजिन चालवितानाचा व्हिडीओ टाकला होता. त्या व्हिडीओसोबत त्याने रेल्वेत नोकरी हवी असल्यास ती मिळवून दिली जाईल, असा मेसेजही पोस्ट केला होता.

यानंतर कामाच्या शोधात असलेल्या जैन यांनी बर्माला आपल्या पत्नीला नोकरीची गरज असल्याचे सांगितले. रेल्वेत नोकरी लावण्याच्या बदल्यात 21 लाख रुपये दिले. पैसे दिल्यावर बर्माच्या पत्नीला नोकरी काही लागली नाही.

फसवणूक झाल्याची लक्षात येताच पोलिसात धाव घेतली

मात्र अनेक दिवस नोकरी लागली नसल्याने अखेर जैन यांनी बर्माकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. मात्र बर्मा त्यांना प्रतिसाद न देता उडवाउडवीची उत्तर देत असल्याने कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात उमाशंकर बर्माच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

सध्या पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेत बर्मा याने अशा प्रकारे अन्य किती जणांना रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली याचा तपास करीत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.