कल्याणला हादरवणारं अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण, मुख्य आरोपी अखेर जेरबंद

Kalyan Minor Girl Murder Case : अल्पवयीन मुलीच अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात मुख्य आरोपी फारार होता. पण आता त्याला अटक झाली आहे.

कल्याणला हादरवणारं अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण, मुख्य आरोपी अखेर जेरबंद
Kalyan Minor Girl Murder Case
Follow us
| Updated on: Dec 25, 2024 | 11:40 AM

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला अखेर पोलिसांनी पकडलं आहे. कल्याण पोलिसांची सहापथकं त्याच्या मागावर होती. शेगाव येथून पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतलं. विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण कल्याणला हादरवून सोडलं आहे. लोकांच्या मनात या घटनेवरुवन प्रचंड रोष आहे. परवा संध्याकाळी कल्याण कोळसाडी परिसरातून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह काल दुपारी कल्याण भिवंडी मार्गावरील बापगाव परिसरात एका कब्रस्तानमध्ये सापडला.

अल्पवयीन मुलीच अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात मुख्य आरोपी फारार होता. पण आता विशाल गवळीला अटक झाली आहे. मुलीला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. विशाल गवळी अत्यंत खतरनाक गुंड आहे. त्याच्यावर कल्याण पूर्वेत विनयभंगाचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय बलात्कार, पॉक्सो सारख्या गुन्हयांमधील हा आरोपी तडीपार होता.

आंदोलनानंतर पोलीस सतर्क

अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर तणावाचं वातावरण आहे. राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिकानी आंदोलन करण्याचा इशारा दिला. बदलापूर घटनेच्या पार्शवभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात आहे. नागरिकांच्या आंदोलनानंतर पोलीस सतर्क झाले आहेत. कल्याण कोळशेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. राजकीय पक्ष व स्थानिक नागरिकांच्या इशाऱ्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आज पहाटेपासूनच कल्याण कोळसेवाडी परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला. चौकाचौकात मोठा बंदोबस्त लावला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.