Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याच्याकडून ज्याने कोल्ड्रिंक घेतली, तो लूटला गेला, कल्याण पोलिसांची मोठी कारवाई

कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लूटणाऱ्या भामट्याला कल्याण जीआरपीने अटक केली आहे. (One Arrested In Case Of Robbing Passengers)

त्याच्याकडून ज्याने कोल्ड्रिंक घेतली, तो लूटला गेला, कल्याण पोलिसांची मोठी कारवाई
Kalyan Crime News
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 2:21 PM

कल्याण : चालत्या ट्रेनमध्ये अनोळखी व्यक्तीकडून काही खायला किंवा प्यायला घेत असाल (One Arrested In Case Of Robbing Passengers) तर सावधान. कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लूटणाऱ्या भामट्याला कल्याण जीआरपीने (Kalyan GRP) अटक केली आहे. गोविंदराम चौधरी असे या भामट्याचे नाव असून त्याने आतार्पंयत अनेक जणांना लूटलं आहे (One Arrested In Case Of Robbing Passengers).

काही दिवसांपूर्वी दिलीप भाई साकला नावाच्या व्यक्ती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात आला. ही व्यक्ती बंगळुरुला राहतात. त्यांना बंगळूरहून अजमेरला जायचं होतं. त्यासाठी त्यांनी एक्स्प्रेस पकडली. कल्याण स्टेशन गाठण्यापूर्वी मात्र त्यांची झोप उडाली. कारण, त्यांच्या हातातील महागडे ब्रेसलेट गायब होते.

पोलिसांनी विचारपूस केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, ट्रेनमध्ये एका तरुणाने त्यांच्याशी मैत्री केली. त्याने त्यांच्याकरीता कोल्ड्रिंग आणले होते. कोल्ड्रिंग घेतल्यावर त्यांना झोप आली.

हे ऐकल्यावर पोलीस समजून गेले की, त्यांना गंडा घालण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला. वडदोरा रेल्वे पोलिसांकडून माहिती मिळाली की, गोविंद राम चौधरी या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यांनी कल्याण जवळपास ट्रेनमध्ये एका व्यक्तीला लूटले होते. याप्रकरणी कल्याण जीआरपीचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मिक शाद्रुल यांचे म्हणणे आहे की, गोविंद चौधरी हाच व्यक्ती होता. त्याने दिलीप भाई साकला यांना लूटले होते (One Arrested In Case Of Robbing Passengers).

या प्रकरणात पुढील तपास करीत राजस्थानहून चोरी गेलेला महागडे ब्रेसलेट पोलिसांनी हस्तगत केले आहे. गोविंदराम चौधरी हा राजस्थानचा राहणारा आहे. चांगल्या घरातील आहे. त्याला आफीमचे व्यसन आहे. तो ट्रेनमध्ये तिकीट घेऊन प्रवास करतो आणि खाण्या-पिण्याच्या पदार्थामध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लूटतो. वडदोरामध्ये अशा प्रकारचे त्याने दोघांना लुटले केले आहे. या व्यतिरिक्त चौधरी याने अशा प्रकारे किती लोकांना गंडा घातला आहे. याचा तपास सुरु आहे.

One Arrested In Case Of Robbing Passengers

संबंधित बातम्या :

धक्कादायक! कारागृहात कैद्याची पोलिसाला मारहाण, दगड उचलून जीवे मारण्याचाही प्रयत्न

टिंडरवर सुंदर महिलेचा मोह महागात पडला, गळ्यावर चाकू ठेवत 55 लाख रुपयांची लूट

व्हिडीओ गेम खेळताना मैत्री, नंतर प्रेम; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांच्या बेड्या

संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'.
राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी
राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी.
मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल
मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल.
फडणवीसांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, 'त्या' विधानावरून फटकारलं
फडणवीसांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, 'त्या' विधानावरून फटकारलं.
'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल
'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल.
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं.
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप.
नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं
नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं.
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार.