kalyan: कंपनीत पंचिंग करुन आत गेलेला कर्मचारी गायब, पाच दिवसांपासून पोलिस घेत आहेत शोध, पाहा कुठे घडली ही घटना
kalyan: कंपनीत कामाला गेलेला कर्मचारी गायब, पोलिसांसह श्वानपथक टीम सुध्दा हतबल, पाच दिवसांपासून कामगार वर्गामध्ये भीतीचे वातावरण
कल्याण – कंपनीत पंचिंग (punching) करुन आतमध्ये गेलेला कर्मचारी गायब झाल्याची धक्कादायक घटना कल्याण मधील शहाड (kalyan shahad) परिसरात घडली आहे. पोलिस (Kalyan Police) आणि श्वानपथक सुध्दा कर्मचाऱ्याचा शोध घेऊन हतबल झाले आहेत. विशेष म्हणजे पाच दिवसांपुर्वी ही घटना घडली असून अद्याप त्या कर्मचाऱ्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
कल्याण मधील शहाड येथील सेंचुरी रेयॉन कारखान्याच्या केमिकल विभागात काम करीत असणारा कर्मचारी शुक्रवारी अचानक गायब झाला. कंपनीतून अचानक गायब झाल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीतील अधिकाऱ्यांनी कल्याण पोलिस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली आहे.
अचानक कर्मचारी गायब झाल्यामुळे कामगार वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले झाले आहे .विशेष म्हणजे या कंपनीत हाय सेक्युरिटी आहे. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे असून गेल्या पाच दिवसपूर्वी शुक्रवारी दुपारी दुसऱ्या शिफ्टमध्ये या कंपनीच्या केमिकल विभागात काम करीत असलेला पंकज मिश्रा हा कर्मचारी कारखान्यात कार्ड पंचिंग करून कामाला गेला.
कारखान्यातून पंकज मिश्रा यांच्या ड्युटीची वेळ संपूनही तो बाहेर पडला नाही, मग तो गेला कुठे हा विचार कंपनीला पडला आहे. कल्याण पोलिसांनी ठाण्यावरून श्वानपथक पथक बोलवून कंपनीत शोध सुरू केला. तरी सुध्दा हा कामगार सापडला नाही. आता पोलिसांनी वेगवेगळ्या टीम स्थापन करत त्याचा शोध सुरू केला आहे. मात्र कंपनीतून एखादा कामगार अचानक गायब झाला ही बातमी पसरता कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी मध्ये भीती निर्माण झाली आहे.
आम्हाला न्याय मिळणार कधी यासाठी हरवलेल्या कामगाराचे कुटुंब पोलिसाकडे अपेक्षेने पाहत आहे. तर याबाबत सेंचुरी कारखान्याचे पीआरओ मेहुल लालका याच्याशी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आम्ही प्रेसनोट काढली आहे असे सांगितले. दरम्यान कंपनी व्यवस्थापन कसून शोध घेत आहे.