Kanpur Triple Murder | ओमिक्रॉन सर्वांचा जीव घेईल, डॉक्टर नवऱ्याकडून पत्नी आणि दोन मुलांची हत्या

"ओमिक्रॉन सर्वांचा जीव घेईल, माझ्या निष्काळजीपणामुळे, मी अशा ठिकाणी अडकलो आहे, जिथून बाहेर पडणं कठीण आहे." असं डॉक्टरने डायरीत लिहिलं आहे. आरोपी डॉक्टर गेल्या काही काळापासून नैराश्याच्या गर्तेत असल्याचं समोर आलं आहे.

Kanpur Triple Murder | ओमिक्रॉन सर्वांचा जीव घेईल, डॉक्टर नवऱ्याकडून पत्नी आणि दोन मुलांची हत्या
कानपुरात डॉक्टरकडून कुटुंबातील तिघांची हत्या
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 8:28 AM

लखनौ : डॉक्टर पतीने पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या (Kanpur Triple Murder) केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारी उघडकीस आला. हत्येनंतर आरोपी डॉक्टर सुशील कुमार (Dr Sushil Kumar) पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. “ओमिक्रॉन (Omicron) सर्वांचा जीव घेईल” अशी भीती व्यक्त करत त्याने हातोड्याने वार करत कुटुंब संपवलं.

सुसाईड नोटमध्ये काय?

हत्येच्या ठिकाणी सापडलेल्या डायरीवरुन डॉक्टरला ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविषयी चिंता सतावत असल्याचं दिसतं. “ओमिक्रॉन सर्वांचा जीव घेईल, माझ्या निष्काळजीपणामुळे, मी अशा ठिकाणी अडकलो आहे, जिथून बाहेर पडणं कठीण आहे.” असं डॉक्टरने डायरीत लिहिलं आहे. आरोपी डॉक्टर गेल्या काही काळापासून नैराश्याच्या गर्तेत असल्याचं समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?

डॉ. सुशील कुमार हा कानपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्याने 48 वर्षीय पत्नी, 18 वर्षीय मुलगा आणि 15 वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर भावाला फोन करुन त्याने या तिहेरी हत्याकांडाची माहिती दिली आणि पोलिसांना बोलवायला सांगितलं. मात्र भाऊ किंवा पोलीस येण्याच्या आतच तो घटनास्थळावरुन परागंदा झाला.

असाध्य आजाराने ग्रासल्याचा उल्लेख

पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. रक्ताने माखलेला हातोडा पोलिसांना घटनास्थळी सापडला आहे. डायरीमध्ये त्याने ‘असाध्य आजाराने’ ग्रासल्याचा उल्लेख केला आहे. आपण आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्यामुळे सर्वांना मोक्ष मिळवून दिला आहे, असंही त्याने म्हटलं आहे.

डॉक्टरने आत्महत्या केल्याची शंका

डॉक्टरची डायरी हीच सुसाईड नोट मानून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हत्याकांडानंतर डॉक्टरनेही स्वतःच्या आयुष्याची अखेर केल्याची शंका पोलिसांना आहे. त्याने पाण्यात उडी मारुन जीव दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून गंगा नदीत त्याचा शोध घेतला जात आहे.

संबंधित बातम्या :

वकिलीचा अभ्यास, मानसशास्त्रात पारंगत, सोशल मीडियावर महिलांना फसवायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाची हत्या, 12 तासांत आरोपींना बेड्या; वाहनांना लुटणारी टोळीही गजाआड

गावठी कट्टा आणायला लावला, नंतर गोळ्या झाडल्या, अनैतिक संबंध उघड झाल्याने केली पतीची हत्या

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.