VIDEO | नोट एक के पिछे एक, तमाशा देख, पाईपमध्ये 13 लाखांच्या नोटा लपवल्या, लाचखोर इंजिनिअरचा जुगाड

कर्नाटकातील इंजिनिअर महाशयांनीही देसी जुगाड केला, मात्र नको त्या उद्योगांसाठी. त्याने चक्क रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पर्जन्य जल संधारणाच्या पाईपमध्ये 13 लाख रुपये लपवले होते.

VIDEO | नोट एक के पिछे एक, तमाशा देख, पाईपमध्ये 13 लाखांच्या नोटा लपवल्या, लाचखोर इंजिनिअरचा जुगाड
पाईपलाईनमधून पैसे बाहेर काढताना
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 10:11 AM

बंगळुरु : पैसे कमवण्यासाठी डोकं लावायचं सोडून ते आयते मिळवण्यासाठी डोकं लढवलं जाण्याच्या घटना आपल्या देशात कमी नाहीत. मात्र आपली पोलीस यंत्रणा, प्रशासन सुसज्ज असल्यामुळे बहुतांश वेळा झटपट श्रीमंतीची स्वप्नं पाहणाऱ्यांना तुरुंगातच जावं लागतं. कर्नाटकातील बंगळुरुमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या ज्युनिअर अभियंत्याची स्वप्नं धुळीस मिळवली. जवळपास 55 लाख रुपयांच्या रोकडीसह घर, शेत जमीन अशी कोट्यवधींची माया जप्त करण्यात आली आहे.

तर या अभियंत्याने एक देसी जुगाड केला होता… आता देसी जुगाड म्हणजे काय, हे कोणाला वेगळं सांगायला नको. भारतीयांनी अचाट शोध लावून केलेल्या काही क्लुप्त्यांना देसी जुगाड असं गोंडस नाव आपल्या सोशल मीडियावर देण्यात आलं आहे.

अभियंत्याचा देसी जुगाड

देसी जुगाड म्हणजे काय असतं, तर सायकलवर मोठं बास्केट ठेवून एखादा बाबा त्यात आपल्या दोन पोरांना बसवतो. किंवा एखादी ताई मोबाईल ठेवण्यासाठी तिच्या साडीला खिसा शिवून घेते. म्हणजेच उपलब्ध साहित्यांचा पुरेपूर वापर करत आपल्या सोयीनुसार केलेला सकारात्मक उपयोग. तर, कर्नाटकातील या इंजिनिअर महाशयांनीही देसी जुगाड केला, मात्र नको त्या उद्योगांसाठी. त्याने चक्क रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पर्जन्य जल संधारणाच्या पाईपमध्ये 13 लाख रुपये लपवले होते.

कर्नाटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी कलबुर्गी येथील या कनिष्ठ अभियंत्याच्या घरातून सुमारे 13 लाख रुपये रोख जप्त केले. रेन वॉटर हार्वेस्टिंग पाईपमध्ये लपवलेल्या चलनी नोटा जप्त करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कोट्यवधींची माया जप्त

सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात पीडब्ल्यूडीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम करणाऱ्या एस. एम. बिरादार (SM Biradar) याच्या ठिकाण्यांवर छापा टाकल्यानंतर दोन घरं, बंगळुरुमधील एक जागा, तीन कार, एक दुचाकी, एक स्कूल बस, दोन ट्रॅक्टर, 54.50 लाख रुपयांची रोकड, 36 एकर शेतजमीन, 100 ग्रॅम दागिने आणि 15 लाख रुपये किमतीच्या घरगुती वस्तू जप्त केल्या आहेत. बुधवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | गृहपाठ न करता खेळायला गेला, बापाने आठ वर्षांच्या मुलाला हातपाय बांधून छताला उलटं टांगलं

नगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या, धक्क्यातून अल्पवयीन प्रियकराचाही शेतात गळफास

पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, दुष्कृत्य केल्यानंतर चालत्या कारमधून फेकले

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.