दोघींसोबत रिलेशनशीपमध्ये, वादावादीतून एकीची समुद्रात उडी, गर्लफ्रेण्डला वाचवताना तरुणाचा बुडून मृत्यू

एकाच वेळी दोन तरुणींसोबत रिलेशनशीपमध्ये असलेला लॉय डिसुझा एका गर्लफ्रेण्डचा जीव वाचवण्याच्या नादात समुद्रात बुडून मृत्युमुखी पडला. कर्नाटकातील सोमेश्वरमध्ये ही घटना घडली.

दोघींसोबत रिलेशनशीपमध्ये, वादावादीतून एकीची समुद्रात उडी, गर्लफ्रेण्डला वाचवताना तरुणाचा बुडून मृत्यू
मयत लॉय डिसुझा - फोटो सौजन्य - फेसबुक
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 1:11 PM

बंगळुरु : एकाच वेळी दोन तरुणींसोबत रिलेशनशीपमध्ये राहण्याची मस्ती एका तरुणाच्या चांगलीच अंगलट आली. वादावादीनंतर समुद्रात उडी मारुन त्याची एक गर्लफ्रेण्ड (Girlfriend) आत्महत्येचा प्रयत्न करत होती. यावेळी तरुणाने तिचा जीव तर वाचवला, मात्र या नादात तो स्वतः बुडाला. कर्नाटकातील (Karnataka) सोमेश्वर येथे गेल्या शुक्रवारी हा दुर्दैवी प्रकार घडल्याचं समोर आला आहे. या घटनेत 28 वर्षीय लॉय डिसुझाचा (Lloyd D’souza) मृत्यू झाला. लॉय दोघींसोबत डबल गेम खेळून फसवणूक करत असल्याचं लक्षात आल्यानंतर या प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी तिघं समुद्र किनारी जमले होते. मात्र समोरासमोर एकत्र आल्यानंतर गाठी सुटण्याऐवजी वाढत गेल्या. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी तिघे समोरासमोर आले खरे, मात्र त्यात तरुणाचा अंत झाला.

काय आहे प्रकरण?

एकाच वेळी दोन तरुणींसोबत रिलेशनशीपमध्ये असलेला लॉय डिसुझा एका गर्लफ्रेण्डचा जीव वाचवण्याच्या नादात समुद्रात बुडून मृत्युमुखी पडला. कर्नाटकातील सोमेश्वरमध्ये ही घटना घडली. अवघ्या 28 व्या वर्षी मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र या अपघाताबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

एलियारपाडाव येथे राहणाऱ्या लॉयने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दोन्ही तरुणींनी त्याला सोमेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर बोलावले होते.

तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

जोरदार वादावादी झाल्यानंतर, एका तरुणीने सांगितले की, लॉय इतर कोणावरही प्रेम करत असल्याचे वास्तव आपण स्वीकारु शकत नाही. त्यानंतर तिने जीव देण्यासाठी समुद्रात उडी मारली, तेव्हा तिला वाचवण्यासाठी लॉयनेही समुद्रात उडी घेतली.

खडकावर डोकं आपटून ठार

लॉय तिला वाचवण्यात यशस्वी ठरला, पण तो स्वतः समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहात अडकला आणि त्याचे डोके एका खडकावर आपटले. उपस्थितांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लॉयने प्राण वाचवलेली तरुणी रुग्णालयात उपचार घेत आहे. उल्लाल पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच वेळी दोघींशी प्रेमसंबंध

पोलिसांनी सांगितले की लॉय आखाती देशात काम करत होता, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यावर तो कर्नाटकातील त्याच्या मूळ गावी परतला. गेल्या वर्षभरात आधीपासूनच ओळख असलेल्या दोन तरुणींशी त्याची मैत्री वाढली होती.

त्यापैकी एका तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याचे दुसऱ्या तरुणीसोबतही प्रेमसंबंध सुरु झाले. जेव्हा त्याच्या मैत्रिणींना लॉय त्यांची फसवणूक करत असल्याचे कळले, तेव्हा त्यांनी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी समोरासमोर येण्याचे ठरवले. मात्र या वादाची अशी दुर्दैवी अखेर झाली.

संबंधित बातम्या :

नवऱ्याला सरप्राईज गिफ्ट देण्याची तयारी, बायकोलाच बसला शॉक, फसवणुकीमुळे आनंदावर विरजण

वैज्ञानिक असल्याचं भासवून 15 महिलांना लग्नाची गळ, विवाहित तरुणाकडून एक कोटींचा गंडा

तीन लाख देऊन ‘लग्नाळू’ तरुण बोहल्यावर, दहाच दिवसात वधू म्हणाली, “सोडा.. मला आधीच दोन…”

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.