नवऱ्यावर स्लो पॉयजनचा प्रयोग सुरु केलेला, पण त्याने काही झालं नाही, मग एकदिवस पत्नीने….

तिने नवऱ्याच्या जेवणात विष मिसळण्यास सुरुवात केली. आरोपी पत्नी ब्यूटी पार्लर चालवायची. घटनेच्या रात्री बालकृष्ण आईच्या हाताने बनवलेल जेवण जेवला.

नवऱ्यावर स्लो पॉयजनचा प्रयोग सुरु केलेला, पण त्याने काही झालं नाही, मग एकदिवस पत्नीने....
Extramarital affair
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 5:18 PM

परपुरुषाच्या प्रेमात बुडालेल्या एका विवाहित महिलेने नवऱ्यावर स्लो पॉयजनचा प्रयोग सुरु केला. तिने नवऱ्याच्या जेवणात विष मिसळण्यास सुरुवात केली. रोज विष मिसळलेलं जेवण जेवल्यामुळे नवऱ्याची प्रकृती बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल केलं. आजारपणामुळे नवऱ्याचा मृत्यू होईल असं तिला वाटलेलं. पण उपचार सुरु केल्यानंतर नवऱ्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. पत्नीला कळलं की, नवरा प्रेमात अडथळा ठरणार. त्यानंतर तिने प्रियकराच्या साथीने नवऱ्याची हत्या केली. कर्नाटकच्या उडीपी जिल्ह्यातील करकला तालुक्यातील हे प्रकरण आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपी पत्नी ब्यूटी पार्लर चालवायची. तिची एका बिझनेसमन युवकासोबत ओळख झाली. दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. दोघांमध्ये प्रेम झालं. महिलेच्या नवऱ्याला याबद्दल समजल्यानंतर त्याने तिला रोखलं. हे सर्व बंद करण्यास सांगितलं. त्यानंतर तिने आपल्या मार्गातून नवऱ्याला हटवण्याच प्लानिंग सुरु केलं. तिने नवऱ्याच्या जेवणात हळूहळू विष मिसळण्यास सुरुवात केली. त्यामुळे नवऱ्याची लिवर आणि किडनी खराब झाली. बंगळुरु आणि मंगळुरुमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. बरा होऊन घरी परतल्यानंतर नवऱ्याची हत्या केली.

नवरा झोपल्यानंतर तिने….

स्लो पॉयजनमुळे नवऱ्याचा मृत्यू झाल्यास कोणाला काही संशय येणार नाही असं महिलेला वाटलं. मागच्या महिन्याभरापासून बालकृष्ण पुजारी आजारी होता. त्याला ताप आणि उलटीचा त्रास सुरु झाला. काविळ असल्याचे समजून कुटुंबियांनी बंगळुरु, मंगळुरु येथे उपचार केले. उपचारानंतर तब्येत सुधारली. पत्नी बालकृष्णला घरी घेऊन आली. घटनेच्या रात्री बालकृष्ण आईच्या हाताने बनवलेल जेवण जेवला. त्यानंतर तो आपल्या खोलीत झोपायला निघून गेला. पत्नी त्याच्यासोबत होती. रात्री नवरा झोपल्यानंतर तिने प्रियकराला फोन करुन बोलवून घेतलं. दोघांनी मिळून बाळकृष्णची गळा आवळून हत्या केली. आरोपी दिलीप तिथून निघून गेला. सकाळी प्रतिमाने बाळकृष्णच्या मृत्यूची माहिती दिली. संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चौकशी केल्यानंतर प्रतिमाने गुन्हा कबूल केला.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.