खोलीत कोब्रा सोडून 25 वर्षीय पत्नीची हत्या, पती दोषी सिद्ध, शिक्षेकडे लक्ष

पत्नी उत्तरा कोल्लमपासून 40 किमी अंतरावर तिच्या मामाच्या घरात राहत होती. झोपेत असताना त्याला नाग चावला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना 7 मे 2020 रोजी घडली होती.

खोलीत कोब्रा सोडून 25 वर्षीय पत्नीची हत्या, पती दोषी सिद्ध, शिक्षेकडे लक्ष
केरळात नाग सोडून पत्नीच्या हत्येप्रकरणी पती दोषी
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 2:32 PM

तिरुअनंतपुरम : पत्नीला सर्पदंश करुन तिची हत्या केल्याप्रकरणी केरळातील पती दोषी आढळला आहे. आरोपी सुरजने हुंड्यासाठी 25 वर्षीय पत्नी उत्तराचा हुंड्यासाठी छळ करुन हत्या केल्याचा आरोप आहे. कोल्लमच्या सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला असून बुधवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

पत्नी उत्तरा कोल्लमपासून 40 किमी अंतरावर तिच्या मामाच्या घरात राहत होती. झोपेत असताना त्याला नाग चावला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना 7 मे 2020 रोजी घडली होती. त्यावेळी सुरज-उत्तराच्या लग्नाला 2 वर्षे झाली होती आणि त्यांना एक वर्षाचे मूलही आहे.

फिर्यादींनी उत्तराचा पती सुरज एस कुमारवर आरोप केला आहे की त्याने पत्नीच्या खोलीत मुद्दाम कोब्रा सोडला होता, जेणेकरुन नागाने चावा घेतल्यामुळे तिचा मृत्यू होईल. हा संपूर्ण कट रचण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तपासात असेही समोर आले आहे की गेल्या वर्षी 2 मार्च रोजीही सुरजने पत्नीची हत्या करण्याच्या उद्देशाने घरात कोब्रा सोडला होता.

आधीही नाग सोडून हत्येचा प्रयत्न

2 मार्च 2020 रोजी, पथानामथिट्टा जिल्ह्यातील अदूरजवळ पारकोडे येथे पतीच्या घरी असताना उत्तराला नाग चावला होता. त्यावेळी तिरवल्ला येथील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात तिच्यावर जवळपास 16 दिवस उपचार करण्यात आले होते. रसेल वायपर साप चावल्यामुळे ती पूर्णपणे आजारी पडली होती. ती 52 दिवस अंथरुणावर पडून होती. यानंतर तिची प्लास्टिक सर्जरीही करावी लागली होती.

काय घडलं होतं

उत्तराच्या आईच्या दाव्यानुसार तिची मुलगी आणि सुरज जेवणानंतर झोपायला गेले होते. सुरज उशिरा उठायचा. पण दुसऱ्या दिवशी तो लवकर उठून बाहेर गेला होता. तर उत्तराला नेहमीच्या वेळेवर जाग आली नव्हती. तिची आई खोलीत गेली तेव्हा तिला उत्तरा बेशुद्धावस्थेत आढळली होती. नंतर खोलीची झडती घेतली असता तिथे एक नाग सापडला, ज्याला ठार मारण्यात आले.

दहा लाखांची रोकड, कार-सोनं हुंड्यात

सुरजला हुंडा देण्यात आला. यामध्ये 10 लाख रुपये रोख, मालमत्ता, नवीन कार आणि सोन्याचा समावेश होता. दोन वर्षांच्या अयशस्वी विवाहानंतरही त्याने अधिक हुंडा मागण्याचा प्रयत्न केला, असा आरोप उत्तराच्या आईने केला.

उत्तराच्या मृत्यूवरुन तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या संशयाच्या आधारे सुरजला 24 मे रोजी अटक करण्यात आली होती. 12 जुलै रोजी सुरजने जाहीरपणे कबूल केले की त्याने कोल्लममधील परीपल्ली येथील गारुडी सुरेश कुमार यांच्याकडून 10 हजार रुपयांना दोन वेळा साप खरेदी केले होते.

आरोपपत्रामध्ये काय काय

माजी ग्रामीण एसपी एस हरिशंकर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने उत्तराचे शवविच्छेदन आणि सापाच्या शव चाचणीसारखे वैज्ञानिक पुरावे न्यायालयात सादर केले होते. 1 नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार सुरजने दोन वेळा विषारी साप सोडून उत्तराला मारण्याचा प्रयत्न केला होता.

बुधवारी शिक्षेची सुनावणी

सुरजला विषारी साप सुपूर्द करणारा गारुडी हा या प्रकरणातील आरोपी असला, तरी 1 डिसेंबरपासून सुरु झालेल्या खटल्यात तो सरकारी साक्षीदार बनला. सुनावणीदरम्यान, त्याने हेतू जाणून घेतल्याशिवाय सुरजला नाग सुपूर्द केल्याचे न्यायालयाला सांगितले. सुरजवर पत्नीची हत्या केल्याचा आरोप होता, तर त्याचे आई-वडील आणि बहिणीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप होता. उत्तराचे पालक विजयसेनन आणि मणीमेगलाईसह अनेक जण या खून प्रकरणाच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या प्रकरणी बुधवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या :

खोलीत साप सोडून सासूची हत्या, प्रियकराच्या साथीने सुनेचं षडयंत्र, सरन्यायाधीश म्हणाले, लायकी नाही तुमची…

सोन्याच्या दागिन्यांचा हव्यास, चुलत सासूची हत्या करुन सुनेने दागिने ओरबाडले, कानाचेही लचके

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.