उमेश कोल्हे हत्या प्रकरण, आरोपीची जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव

नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

उमेश कोल्हे हत्या प्रकरण, आरोपीची जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव
उमेश कोल्हे यांच्या मारेकऱ्याची जामिनासाठी न्यायालयात धावImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 9:10 PM

मुंबई / ब्रिजभान जैस्वार (प्रतिनिधी) : अमरावतीतील उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणातील आरोपी डॉ. युसूफ खान बहादूर खान याने जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात धाव घेतली आहे. भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. या वक्तव्याला समर्थन दर्शवल्याने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेला या प्रकरणात तपास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्यानंतर याची चौकशी सुरू झाली होती. त्यानंतर अमरावतीतून या 11 ही आरोपींना अटक करण्यात आले होते. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.

अमरावतीतील उमेश कोल्हे हे व्यवसायाने मेडिकल दुकानदार होते. एनआयएने या प्रकरणाला दहशतवादी संघटनेची संबंधित असल्याचे कोर्टात केलेल्या युक्तिवादा दरम्यान म्हटले होते.

एनआयएकडून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इरफान खान, मुदस्सर अहमद उर्फ सोनू रजा शेख इब्राहिम, शाहरुख पठाण उर्फ बादशाशा हिदायत खान, अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तस्लीम, शोएब खान उर्फ भुर्या साबीर खान, अतीब रशीद आदिल रशीद, युसूफ खान बहादूर खान यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण?

नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता, हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून 2022 रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली.

प्रथमदर्शनी ही हत्या लूट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र हत्येच्या तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले.

यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.