Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टांगावाला ते आसाराम ‘बापू’; वाचा 400 ‘आश्रमा’च्या साम्राज्याची कहाणी!

राजस्थानच्या जोधपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची तब्येत अचानक बिघडली आहे. (know all things about asaram rape case jodhpur jail)

टांगावाला ते आसाराम 'बापू'; वाचा 400 'आश्रमा'च्या साम्राज्याची कहाणी!
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 1:20 PM

जोधपूर: राजस्थानच्या जोधपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची तब्येत अचानक बिघडली आहे. बलात्कारस नरबळी, खून आदी गंभीर गुन्ह्यांसाठी आसाराम शिक्षा भोगत आहे. एकेकाळी प्रचंड ऐश्वर्यात राहणाऱ्या आसारामच्या आश्रमात देशातील अनेक बडे राजकारणी आणि उद्योगपती हजेरी लावायचे. देशभर त्यांचे लाखो अनुयायी होते. पण गंभीर गुन्ह्यात नाव आल्यानंतर आसुमल थाउमल हरपलानी ऊर्फ आसारामच्या साम्राज्याला सुरुंग लागला आणि सर्व काही संपुष्टात आलं. ज्याचा शब्द हजारो लोक प्रमाण मानायचे त्या आसारामच्या साम्राज्याचा घेतलेला हा आढावा. (know all things about asaram rape case jodhpur jail)

सायकल रिपेअरिंग ते टांगावाला

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एक मुलगा फाळणीनंतर गुजरातच्या अहमदाबादला पोहोचला. सुरुवातीला त्याने सायकलच्या दुकानात सायकल रिपेअरिंगचं काम केलं. त्यानंतर टांगा चालवून पोट भरण्यास सुरुवात केली. पण हा मुलगा बघता बघता आसुमलचा आसाराम झाला. आसारामने त्याच्या चरित्रात इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण घेतल्याचं म्हटलं आहे.

सिंधी संताचा अनुयायी बनण्याचा प्रयत्न

आसारामच्या मित्रांच्या मते, त्याने तरुण वयात कच्छचे सिंधी संत लीला शाह बाबाचा अनुयायी बनणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जिद्दी आणि मनमौजी स्वभावामुळे बाबांनी त्यांना अनुयायी म्हणून स्वीकारले नाही. मात्र, आसारामने यावर कधीच भाष्य केलं नाही. त्यानंतर त्याने नंतर लवकरच स्वत:चं नाव बदलून आसाराम ठेवलं आणि संन्याशाचे पांढरे वस्त्र अंगावर परिधान करून संन्यस्त जीवन जगण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याच्या भोवती लोक जमू लागले. 70 च्या दशकात त्याने अहमदाबाद पासून 10 किलोमीटर अंतरावर एका गावात आपला आश्रम सुरू केला. त्यानंतर त्याचं साम्राज्य हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली.

2300 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती

जून 2016मद्ये आयकर विभागाने आसारामची अघोषित संपत्ती 2300 कोटी असल्याचं स्पष्ट केलं होतं. एका रिपोर्टनुसार आसारामचे जगभरात 400 आश्रम आहेत. यातील काही आश्रम जबरदस्तीने हडप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या आश्रमांच्या भूखंडाचा वाद सुरू आहे. कोर्टात अनेक आश्रमांची प्रकरणे प्रलंबित आहेत.

कमाई कशी व्हायची?

आसारामने त्याच्या कार्याची माहिती देणारे साप्ताहिक सुरू केले. त्यातून त्याला वर्षाला कोट्यवधी रुपयांचा फायदा होत होता. त्या शिवाय आश्रमातून दोन डझन उत्पादनेही घेतली जात होती. त्यात आयुर्वेदिक औषधे, गोमूत्र, साबूण, शँम्पू आणि अगरबत्तींचा समावेश होता. सुमारे 400 ट्रस्टच्या हातात हे साम्राज्य होतं. त्या शिवाय दरवर्षी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरु दक्षिणाही जमा केली जायची. या दिवशी आसारामच्या दर्शनाला लाखो लोक यायचे आणि त्यामुळे लाखो रुपयांची दक्षिणा जमा व्हायची.

नरबळीने साम्राज्याला धक्का

एवढं मोठं साम्राज्य उभारल्यानंतरही वाद आणि आसाराम हे समीकरण कायम राहिलं. पतन होण्यापूर्वी 1980 ते 2008 या कालावधीत आसारामने ऐश्वर्यात घालवले. अहमदाबादच्या आश्रमाजवळी साबरमती नदीत दोन शाळकरी मुलींचे मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या पतनास सुरुवात झाली. आसाराम हा तांत्रिक असून तंत्रमंत्रासाठीच त्याने या मुलींचा बळी घेतल्याचं बोललं जात होतं. त्याबाबतचे आरोप सिद्ध झाले नाहीत. पण त्याचे पतन सुरू झालं. त्यावेळी गुजरातमधील तत्कालीन नरेंद्र मोदी सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका आयोगाची स्थापना केली होती. (know all things about asaram rape case jodhpur jail)

असं कोसळलं साम्राज्य

ऑगस्ट 2013 पासून आसारामच्या पतनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. उत्तर प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीने कुटुंबासोबत जाऊन दिल्ली पोलिसात आसाराम विरोधात गुन्हा दाखल केला होता. आसारामने शारीरिक शोषण केल्याचा आरोप या मुलीने केला होता. 20 ऑगस्ट 2013 रोजी या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर आसारामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी नंतर ही केस जोधपूर पोलिसांकडे वर्ग केली. 2 सप्टेंबर 2013मध्ये आसारामचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यातून तो सेक्स करण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि 25 एप्रिल 2018 रोजी आसाराम विरोधातील आरोप सिद्ध होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या काळात 10 हून अधिक साक्षीदारांवर हल्ले करण्यात आले. त्यात तिघांचा मृत्यूही झाला. एकाची तर जोधपूर न्यायालयाच्या परिसरातच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. मात्र, या हत्येचा आसारामशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे पुढे आलेले नाहीत. (know all things about asaram rape case jodhpur jail)

संबंधित बातम्या:

जेलमध्ये आसारामची तब्येत बिघडली, इमर्जन्सी वॉर्डात भरती, भक्तांची हॉस्पिटलबाहेर गर्दी

परीक्षेच्या पेपरला पोहोचण्याआधीच आयुष्याचा पेपर संपला, मध्यप्रदेशातल्या अपघातात 47 जण मृत्यूमुखी, बहुतांश जण विद्यार्थी

कोरोना काळात पहिल्यांदाच अनारक्षित मेल/एक्सप्रेस विशेष गाड्या धावणार; काय असेल खास?

(know all things about asaram rape case jodhpur jail)

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.