AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नितेश राणे हाजीर हो!’ सलग तिसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला हजेरी लावल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय?

जवळपास एका महिन्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून आपण पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाण्यासाठी आणि पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंची सत्ता येण्याआधी निवडणुकीचं मैदान चांगलंच तापलं होतं.

'नितेश राणे हाजीर हो!' सलग तिसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला हजेरी लावल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय?
आमदार नितेश राणे कणकवली पोलीसांत हजेरी लावून आल्यानंतर बोलताना..
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 1:02 PM

सिंधुदुर्ग : जिल्हा बँकेचं राजकारण नितेश राणे आणि संतोष परब हल्लाप्रकरणामुळे चांगलंच तापलं होतं. अटकेची कारवाई नितेश राणेवर होणार, अशी कुजबूज सुरु होती. अनेक दिवस गायब असलेले नितेश अचानकपणे समोर आले. आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) हे गेल्या तीन दिवसांपासून सलग कणकवली पोलिस स्थानकात (Kankavali Police Station) चौकशीसाठी हजर होत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी त्यांनी पोलिसांसमोर हजेरी लावल्यानंतर टीव्ही 9 मराठीसोबत बातचीत केली. यावेळी त्यांनी जवळपास एका महिन्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून आपण पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाण्यासाठी आणि पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर (Sindhudurg District Bank) राणेंची सत्ता येण्याआधी निवडणुकीचं मैदान चांगलंच तापलं होतं. त्यातच संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे अडचणीत येण्याची शक्यता असतानाच जिल्हा सत्र न्यायालयानं नितेश राणेंचा जामीनअर्ज फेटाळला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टानंही नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता राणेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

महिन्याभरानंतची पहिली प्रतिक्रिया काय होती?

सलग तिसऱ्या दिवशी पोलिसांच्या चौकशीला हजर राहिल्यानंतर, नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की,…

कणकवली पोलिसांकडून मला सलग तीन दिवसांसाठी हजर राहण्याची नोटीस दिली होती. तिन्ही दिवस मी सलग हजर झालो आहे. उद्याही इथे येणार आहे. सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलिसांनी मला नोटीस दिली होती, त्याप्रमाणे मी आलो आहे. आधीच मी शब्द दिला होता, की मी पोलिसांच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करेन, त्याप्रमाणे मी पोलिस स्थानकात हजर झालो आहे. याही पुढे जिथे जिथे पोलिसांना माझी गरज लागेल, तेव्हा तेव्हा मी पोलिसांना सामोरं जाईल. उद्या माझ्या अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई हायकोर्ट या दोन्ही ठिकाणी नितेश राणेंचा जामीनअर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान, उद्या (27 जानेवारी) सुप्रीम कोर्टात त्यांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार आहे. आता नेमकं उद्या याप्रकरणी काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कोणत्या प्रकरणी नितेश राणे अडचणीत?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे खंदे समर्थक असलेल्या संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या संतोष परब यांनी नितेश राणेंनी आपल्यावर हल्ला घडवून आणला, असा आरोप केला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नितेश राणेंवर गंभीर आरोपही करण्यात आले होते. दरम्यान, मधल्या काळात निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राणेंनी विजय मिळवला असून सतीश सावंत हे पराभूत झाले आहेत. दरम्यानच्या काळात नितेश राणे हे कुठे होते, असा प्रश्न उपस्थित झाला होता. अचानकपणे नितेश राणे पुन्हा एकदा समोर आल्यामुळे आता संतोष परब हल्लाप्रकरणातील चौकशीतून नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Sindhudurg | काय आहे नेमकं संतोष परब हल्ला प्रकरण? जाणून घ्या

Sindhudurg Postarbaji: सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिंकल्यानंतर राणे समर्थकांकडून पोस्टरबाजी सुरुच

'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं.
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे.
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर.
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट.
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण..
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण...
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले.
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.