AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur : कुटुंबाला खोलीत डांबून घर पेटवलं! कोल्हापूरच्या शिंगणापूरमधील घटनेनं खळबळ, परिसरात घबराट

Kolhapur House Burn : कोल्हापूरच्या शइंगणापूरमध्ये नितीन वरेकर आणि कुटुंबीय राहातात. वरेकर यांचं राहतं घर अज्ञात टोळक्यांनी जाळून टाकण्याचा प्रयत्न केलं.

Kolhapur : कुटुंबाला खोलीत डांबून घर पेटवलं! कोल्हापूरच्या शिंगणापूरमधील घटनेनं खळबळ, परिसरात घबराट
अज्ञात टोळक्यांकडून घर जाळण्याचा प्रयत्नImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 11:32 AM

कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur news) एका कुटुंबावर अज्ञात टोळक्यांनी हल्ला केला. या कुटुंबाला घराच्या एका खोलीमध्ये डांबलं आणि त्यानंतर घरच पेटवून देण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या शिंगणापूरमध्ये (Kolhapur Shinganapur) घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. या धक्कादायक आणि दहशत माजवणाऱ्या प्रकारामुळे कोल्हापुरातील शिंगणापुरात घबराट पसरली आहे या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील संसारोपयोगी सामानाची राख झाली आहे. याप्रकरणी आता अज्ञात टोळक्यांच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान कोल्हापूर पोलिसांसमोर (Kolhapur Police) आहे. आगीमध्ये कुटुंबाचं आर्थिक नुकसान झालं होतं, घराचीही वाताहत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करुन घेण्यात आलीय. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी, अशी शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.

वरेकर कुटुंबीयांमध्ये भीती

कोल्हापूरच्या शइंगणापूरमध्ये नितीन वरेकर आणि कुटुंबीय राहातात. वरेकर यांचं राहतं घर अज्ञात टोळक्यांनी जाळून टाकण्याचा प्रयत्न केलं. घर पेटवण्याआधी वरेकर कुटुंबीयांनी टोळक्यांनी एका खोलीत डांबून ठेवलं होतं. त्यानंतर दुसऱ्या खोलीत संसारोपयोगी कामाच्या वस्तूंना आग लावून दिली.

हे सुद्धा वाचा

वरेकर कुटुंबीयांच्या एका खोलीची पूर्णपणे राख झालीय. आगीत काही सामान एका खोलीत नेऊ जाळण्यात आलं. तसंच कपाटातूनही काही सामान जाळलं असावं, अशी शंका घेतली जातेय. या आगीमध्ये घराच्या एक खोली पूर्णपणे काळवंडली होती. तर सामान जळून राख झालं होतं.

तक्रार दाखल, तपास सुरु

या आगीमध्ये सामानाची प्रचंड नासधूस झाली असून मोठं आर्थिक नुकसान झाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये घबराट पसरली आहे. दरोड्याच्या उद्देशाने तर टोळके आले नव्हते ना, अशीही शंका घेतली जातेय. दरम्यान, आता याप्रकरणी पोलिसांत वरेकर कुटुंबीयांनी तक्रार दिली असून पुढील तपास केला जातोय. जुन्या वादातून वरेकर यांचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला असावा, अशी शंका पोलिसांना आहे. त्याअनुशंगाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात टोळक्यांचा शोध घेण्यास सुरुवात केलीय.

पाकिस्तानचा पापाचा घडा भरला होता - लेफ्टनंट जनरल राजीव घई
पाकिस्तानचा पापाचा घडा भरला होता - लेफ्टनंट जनरल राजीव घई.
पाकिस्तानात झालेल्या नुकसानासाठी ते स्वत:च जबाबदार - ए. के. भारती
पाकिस्तानात झालेल्या नुकसानासाठी ते स्वत:च जबाबदार - ए. के. भारती.
नागरी-लष्करी समन्वयासंदर्भात 'वर्षा'वर बैठक, CM म्हणाले, मी सॅल्यूट...
नागरी-लष्करी समन्वयासंदर्भात 'वर्षा'वर बैठक, CM म्हणाले, मी सॅल्यूट....
पंतप्रधान मोदींचं कौतुक करत गुलाबराव पाटलांची शेरोशायरी
पंतप्रधान मोदींचं कौतुक करत गुलाबराव पाटलांची शेरोशायरी.
Kohli Retirement : कसोटीतील 'विराट' पर्व संपलं, जाणून घ्या बरंच काही
Kohli Retirement : कसोटीतील 'विराट' पर्व संपलं, जाणून घ्या बरंच काही.
शस्त्रबंदी होताच शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 2200 अंकांनी वधारला
शस्त्रबंदी होताच शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 2200 अंकांनी वधारला.
पोरांनो ऑल द बेस्ट, उद्या लागणार 10 वीचा निकाल, 'या' लिंकवर बघा रिझल्ट
पोरांनो ऑल द बेस्ट, उद्या लागणार 10 वीचा निकाल, 'या' लिंकवर बघा रिझल्ट.
.. पण हीच योग्य वेळ, विराटची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, काय म्हणाला?
.. पण हीच योग्य वेळ, विराटची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, काय म्हणाला?.
भारत - पाकिस्तानमधल्या डिजीएमओंच्या चर्चेला सुरुवात
भारत - पाकिस्तानमधल्या डिजीएमओंच्या चर्चेला सुरुवात.
भारत-पाकच्या DGMOच्या बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी काय झाली चर्चा
भारत-पाकच्या DGMOच्या बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी काय झाली चर्चा.