पोलिसांना वाटली चेष्टा, पण घरात पाऊल ठेवताच पोलीसही हादरले, घटस्फोटीत महिलेच्या कृत्याने थरकाप

महिलेने जे काही सांगितलेलं, ते सगळ खरं होतं. ती महिला कोण होती? तुम्ही इथे येऊन मला अटक करा. फोनवरुन हे ऐकल्यानंतर पोलिसांना वाटलं की, कोणी चेष्टा करतय. दमदम भागात संहती सार्थक आणि आपल्या मुलासोबत राहत होती.

पोलिसांना वाटली चेष्टा, पण घरात पाऊल ठेवताच पोलीसही हादरले, घटस्फोटीत महिलेच्या कृत्याने थरकाप
Accused Women Arrest
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 10:52 AM

नवी दिल्ली : तारीख 28 फेब्रुवारी 2024… एका 30 वर्षीय महिलेने पोलिसांना फोन लावला. सांगितलं की, सर मी माझ्या लिव-इन-पार्टनरची हत्या केलीय. तुम्ही इथे येऊन मला अटक करा. फोनवरुन हे ऐकल्यानंतर पोलिसांना वाटलं की, कोणी चेष्टा करतय. पण, तरीही खातरजमा करण्यासाठी काही पोलीस महिलेने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले. अपार्टमेंटमध्ये पाऊल ठेवताच पोलीस हादरले. महिलेने जे काही सांगितलेलं, ते सगळ खरं होतं. ती महिला कोण होती? तिने हे हत्याकांड का केलं? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे दमदम भागात ही धक्कादायक घटना घडली.

30 वर्षांची संहती पाल, पेशाने मेकअप आर्टिस्ट आणि एका मुलाची आई आहे. संहतीने नवऱ्यापासून घटस्फोट घेतलाय. घटस्फोटानंतर संहतीच्या आयुष्यात सार्थक दासची एन्ट्री झाली. 30 वर्षाचा सार्थक पेशाने फोटोग्राफर आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी एकत्र रहाण्याचा निर्णय घेतला. दमदम भागात संहती सार्थक आणि आपल्या मुलासोबत राहत होती. पण मागच्या काही दिवसांपासून संहती आणि सार्थकमध्ये सर्वकाही व्यवस्थित नव्हतं. त्यांच्यात वादविवाद सुरु होते.

ती खूप नॉर्मल वाटत होती, जसं काही घडलच नाही

सार्थकला असं अजिबात वाटलं नाही की, हे मतभेद एकदिवस त्याच्या जीवावर बेततील. बुधवारी संहतीने सार्थकची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर स्वत:च पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी सार्थकचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. शरीरावर चाकूने वार केल्याचे अनेक निशाण होते. मृतदेहाच्या शेजारी चाकू पडलेला. त्याच चाकूने त्याची हत्या करण्यात आली. संहती तिथेच बसलेली होती. एक खूप नॉर्मल वाटत होती, जसं काही घडलच नाही.

सार्थकची हत्या का केली?

पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवला. संहतीला अटक केली. संहतीने आपणहूनच गुन्हा कबूल केला. पण सार्थकची हत्या का केली? त्यामागे नेमक काय कारण आहे? ते अजून संहतीने स्पष्ट केलेलं नाहीय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.