Firing on Brahmins : महायज्ञासाठी आलेल्या ब्राह्मणांवर गोळीबार, लाठीमार, कुठे घडलं?
Firing on Brahmins : केशव पार्क येथे 18 मार्चपासून 1008 कुंडीय शिव-शक्ति महायज्ञ आरंभ झाला आहे.. या महायज्ञासाठी देश भरातून 1500 पेक्षा जास्त ब्राह्मणांना बोलवण्यात आलं आहे. इथे आलेल्या ब्राह्मणांवर गोळीबार, लाठीमार झाला आहे.

यज्ञ सुरु असताना गोळीबाराची घटना घडली आहे. गोळी लागल्यामुळे एक युवक जखमी झाला. कार्यक्रम स्थळी दगडफेक आणि लाठीमार झाला. एका युवकाच्या डोक्याला दगड लागला. यज्ञासाठी वेगवेगळ्या राज्यातून ब्राह्मण बोलवण्यात आले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यज्ञात सहभागी झालेल्या ब्राह्मणांवर लाठीमार करण्यात आला. बाबाच्या बाऊन्सवर गोळ्या चालवल्याचा आरोप आहे. शिळं अन्न या सर्व वादाला कारणीभूत ठरलय. हरियणा कुरुक्षेत्र येथे ही घटना घडलीय.
यज्ञा दरम्यान गोळी लागल्याने जखमी झालेल्या युवकाच नाव आशिष आहे. तो उत्तर प्रदेश लखनऊचा राहणारा आहे. दुसरा युवक प्रिन्स त्याच्या डोक्यात दगड लागला. तो लखीमपुर खीरीचा राहणारा आहे. कुरुक्षेत्रच्या केशव पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या महायज्ञ दरम्यान हा सर्व वाद झाला. यज्ञासाठी आलेल्या ब्राह्मणांवर बाऊन्सरनी गोळीबार केला. एका ब्राह्मण या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. यज्ञ स्थळी तोडफोड करण्यात आलीय.
बघता, बघता वातावरण तापलं
मिळालेल्या माहितीनुसार, यज्ञात सहभागी झालेल्या ब्राह्मणांना शिळं अन्न देण्यात आलं. याचा ब्राह्मणांनी विरोध केला. यावरुन आयोजकाचे सुरक्षा गार्ड आणि ब्राह्मणांमध्ये वाद झाला. बघता, बघता वातावरण तापलं. सुरक्षा रक्षकांनी बंदुक काढून गोळीबार केला. यात लखनऊवरुन आलेल्या आशिष नावाच्या ब्राह्मणाला गोळी लागली. त्याला लगेच एलएनजेपी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
ब्राह्मणांचा आरोप काय?
केशव पार्क येथे 18 मार्चपासून 1008 कुंडीय शिव-शक्ति महायज्ञ आरंभ झाला आहे.. या महायज्ञासाठी देश भरातून 1500 पेक्षा जास्त ब्राह्मणांना बोलवण्यात आलं होतं. या ब्राह्मणांच्या राहण्याची आणि अन्न-पाण्याची व्यवस्था आयोजकांनी केली होती. ब्राह्मणांचा आरोप आहे की, पहिल्या दिवसापासून बाबाचे सुरक्षा गार्ड (बाऊन्सर) कुठल्या ना कुठल्या कारणावरुन त्रास देत होते. कधीही कोणासोबत मारहाण करायचे. कोणी फिरताना दिसला, तर त्याला कानाखाली मारायचे. हा यज्ञ 27 मार्च पर्यंत चालणार आहे. यात भाजपचे प्रदेश अध्यक्ष मोहन लाल, पूर्व मंत्री सुभाष सुधा, राम विलास शर्मा, सीएम नायब सैनी यांची धर्मपत्नी सुमन सैनी, माजी खासदार सुनीता दुग्गलसह पक्षाचे नेते सहभागी झाले आहेत.
तिन्हीवेळा महायज्ञात विघ्न
स्वत:ला यज्ञ सम्राट म्हणणारे स्वामी हरिओम यांनी 108 यज्ञ करण्याचा संकल्प केला आहे. कुरुक्षेत्राच्या थीम पार्कमध्ये हा 102 वा महायज्ञ आहे. यात यज्ञासाठी आलेल्या ब्राह्मणांवर गोळीबार झाल्याने विघ्न निर्माण झालाय. याआधी सुद्धा स्वामींनी दोनवेळा या कुरुक्षेत्राच्या केशव पार्कमध्ये यज्ञ केला आहे. पहिल्या यज्ञाच्यावेळी पावसाच्या पाण्यामुळे यज्ञ कुंड बुडाले होते. दुसऱ्या यज्ञाच्यावेळी अग्निकांड झाल्याने यज्ञात अडथळा आलेला. आता तिसऱ्यांदा महायज्ञात गोळीबारामुळे विघ्न आलय.
स्वामी हरिओम बाऊन्सर घेऊन फिरतात
विश्व कल्याणाच्या हेतूने महायज्ञ करण्याचा दावा करणारे स्वामी हरिओम आपल्यासोबत बाऊन्सर घेऊन फिरतात. भारतीय सैन्याच्या पोषाखात हे बाऊन्सर तैनात असतात. कुरुक्षेत्रावर स्वामीजी संघाशी संबंधित शिक्षा विभागात सेवारत असलेल्या एक कर्मचाऱ्याच्या घरी मुक्काम करतात. या कर्मचाऱ्याने सरकारी सेवेत रुजू होण्याआधी गीता निकेतन आवासीय विद्यालयात नोकरी केली आहे.