एनसीबीला मोठं यश; डोंगरीच्या ड्रग्स क्वीनच्या अटकेने मुंबईतील ड्रग्सच्या रॅकेटचा पर्दाफाश होणार?

इन्स्टाग्रामवरून ड्रग्सची विक्री करणारी डोंगरीतील ड्रग्स क्वीन इकरा कुरैशी हिला अखेर अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. (Lady Don Iqra arrested from Mumbai, used to supply drugs to women)

एनसीबीला मोठं यश; डोंगरीच्या ड्रग्स क्वीनच्या अटकेने मुंबईतील ड्रग्सच्या रॅकेटचा पर्दाफाश होणार?
Crime News
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 1:50 PM

मुंबई: इन्स्टाग्रामवरून ड्रग्सची विक्री करणारी डोंगरीतील ड्रग्स क्वीन इकरा कुरैशी हिला अखेर अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ती एनसीबीच्या टीमला गुंगारा देत होती. अखेर सापळा रचून एनसीबीने तिच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Lady Don Iqra arrested from Mumbai, used to supply drugs to women)

21 वर्षीय इकरा कुरैशी ही राजरोसपणे ड्रग्स विक्री करायची. इन्स्टाग्रामवरून ती ड्रग्सची विक्री करायची. तिने ड्रग्स विक्रीसाठी टोळीही निर्माण केली होती. त्यात 5 ते 6 ड्रग्स पेडलर महिला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. यापूर्वी दोन वेळा ती एनसीबी कार्यालयातही जाऊन आली होती. तिची चौकशीही करण्यात आली होती. मात्र, पुरावे नसल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, एनसीबीच्या मुंबई झोनलचे संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. त्यावेळी इकरा एका टोळीच्या माध्यमातून ड्रग्स विक्री करत असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून एनसीबीची टीम तिचा शोध घेत होते. मात्र, वारंवार जागा बदलत असल्याने तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र, तीन महिन्यानंतर आज अखेर तिला अटक करण्यात एनसीबीला यश मिळालं आहे. तिच्याकडून डोंगरीतून 1.5 लाख रुपये किमतीचे ड्रग्सही जप्त करण्यात आले आहेत.

दोन केसेसमध्ये वाँटेड

दरम्यान, कुख्यात चिंकू पठाण आणि एजाज सायको या ड्रग्स माफिया गँगसोबत इकराचे संबंध असल्याचं उघड झालं आहे. इकरा ही आणखी दोन केसेसमध्येही वाँटेड होती, असं एनसीबीच्या सूत्रांनी सांगितलं.

महिला, तरुणींचा ड्रग्स विक्रीसाठी वापर

इकराने ड्रग्स विक्रीसाठी इन्स्टाग्रामचा वापर केला होता. तसेच महिला आणि तरुणींची टोळी बनवून त्यांच्याकडून तिने ड्रग्स विक्री सुरू केली होती.  संशय बळावू नये म्हणून तरुणांऐवजी महिलांकडून ती हे काम करून घेत होती, असं सूत्रांनी सांगितलं.

मुंबईतील रॅकटे उघड होणार

एनसीबीने गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणावर छापेमारी केल्याने ड्रग्स माफियांचे कंबरडे मोडले आहे. आता थेट ड्रग्स क्वीनलाच अटक केल्याने मुंबईतील ड्रग्सचं मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. तसेच ड्रग्स माफियांची ड्रग्स विक्रीची मोडस ऑपरेंडीही उघड होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

एनसीबीची छापेमारी

दरम्यान, मुंबईत एनसीबीने काल चार ठिकाणी छापे मारले. एनसीबीने लोखंडवाला, ठाणे, वसई आणि ओशिवरा येथे ही छापेमारी केली. तसेच या धाडीत चार ड्रग्स विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या ड्रग्स पेडलरमध्ये हायप्रोफाईल ड्रग्स विक्रेत्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्स ताब्यात घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Lady Don Iqra arrested from Mumbai, used to supply drugs to women)

संबंधित बातम्या:

Corona Cases and Lockdown News LIVE : पनवेल महानगरपालिका हद्दीतील लसीकरण 6 एप्रिलपासून बदं

पाच वर्षांपूर्वी एकमेकांना शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन, तरीही शुल्लक कारणावरुन पत्नीवर गोळी झाडली

फांदी मोडली, कौमार्य चाचणीत नवविवाहिता नापास, वरबंधूंनी लग्न मोडलं!

(Lady Don Iqra arrested from Mumbai, used to supply drugs to women)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.