घातली बिकनी म्हणून प्राध्यापिकेला सोडावी लागली नोकरी! बिकनी घालणाऱ्या मुलींनो, ही बातमी वाचाच

Bikini Professor News : हा धक्कादायक प्रकार एका सहाय्यक प्राध्यापिकेसोबत घडलाय. कोलकातामधील सेंट झेविअर्स विद्यापीठात कामाला असलेल्या या सहाय्यक प्राध्यापिकेविरोधात पालकांनी तक्रार केली होती.

घातली बिकनी म्हणून प्राध्यापिकेला सोडावी लागली नोकरी! बिकनी घालणाऱ्या मुलींनो, ही बातमी वाचाच
ऐकावं ते नवलंच!Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 2:33 PM

कुणी काय कपडे घालायचे, हा खरं तर ज्याचा त्याचा प्रश्न. पण प्राध्यापिकेने घातलेल्या कपड्यांमुळे तिला नोकरी सोडण्याची वेळ ओढावली आहे. एका प्राध्यापिकेनं (Professor) केलेल्या आरोपांनुसार, बिकनी (Bikini) घातल्यामुळे तिला नोकरी गमवावी लागलीय. हा आश्चर्यकारक प्रकार कोलकातामध्ये घडला आहे. पालकांनी केलेल्या तक्रारीमुळे या प्राध्यापिकेला नोकरीवरुन राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचं समोर आलंय. या प्राध्यापिकेचे विद्यार्थी तिचे बिकनीतले फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) पाहत बसायचे, म्हणून हा प्रकार घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. काही पालकांनी आपल्या मुलांची ही हरकत पकडली. त्यानंतर तक्रार करण्यात आली. अखेर विद्यापीठाने बिकनी घालणाऱ्या या प्राध्यापिकेला नोकरीचा राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं, असा आरोप करण्यात आलाय. या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होतो, असा आरोप करत बिकनी घालणाऱ्या प्राध्यापिकेला पालकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं.

पालकांची अजब तक्रार

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांमुळे हा प्राध्यापिकेची ओळख लपवण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार एका सहाय्यक प्राध्यापिकेसोबत घडलाय. कोलकातामधील सेंट झेविअर्स विद्यापीठात कामाला असलेल्या या सहाय्यक प्राध्यापिकेविरोधात पालकांनी तक्रार केली होती. ही प्राध्यापिका बिकनीतले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असे, असा आरोप पालकांनी केली. हे फोटो विद्यार्थी पाहताना पालकांनी पकडलं. त्यानंतर विद्यापीठाकडे तक्रार केली. अखेर विद्यापीठाने या सहाय्यक प्राध्यापिकेविरोधात आक्षेपार्ह, अश्लिल आणि मर्यादेचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली.

हे सुद्धा वाचा

तक्रारीचं पत्र व्हायरल

सोशल मीडियावर या प्राध्यापिकेविरोधात देण्यात आलेल्या तक्रारीचं पत्रही व्हायरल करण्यात आलं आहे. द वायरने दिलेल्या वृत्तानुसार बीके मुखर्जी यांनी हे पत्र शेअर केलं असून या सहाय्यक प्राध्यापिकेला नोकरी गमवावी लागली आहे. नोकरी सोडण्याबाबत जेव्हा विद्यापीठाच्या कुलगुरुंनी सांगितलं, तेव्हा या प्राध्यापिकेला तक्रारीचं पत्र आणि काही आक्षेपार्ह वाटणारे फोटोही दाखवण्यात आले होते. 7 ऑक्टोबर 2021 रोजी कुलगुरुंसोबत झालेल्या भेटीदरम्यान हा सगळा किस्सा घडल्याचं व्हायरल पोस्टमध्ये समोर आलंय.

विद्यापीठाची प्रतिष्ठा धोक्यात येऊ म्हणून तक्रारीवर दखल घेत आपल्याला काढून टाकण्यात आलं, असा आरोप प्राध्यापिकेनं केलाय. पण आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचं खंडणही तिनं केलंय. मॅनेजमेन्टच्या दबावामुळे आपल्याला राजीनामा देण्यास भाग पाडलं, असाही आरोप तिनं केलाय. यानंतर या सहाय्यक प्राध्यापिकेनं 14 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस तक्रारही दाखल केली. या तक्रारीत आपलं प्रायव्हेट इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं असून त्यातली माझ्या फोटोंचा गैरवापर झाला असावा, असा संशय संबंधित प्राध्यापिकेनं केलाय.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.