आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठलं! 5 जण जागीच ठार

स्विफ्ट कारने ते पुन्हा उदगीरकडे परतत होते, पण कारमधील पाच जण अपघातात जागीच ठार झाले. पण एक तरुणी गंभीररीत्या जखमी झाली.

आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठलं! 5 जण जागीच ठार
लातुरात भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 12:35 PM

महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर : देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात (Latur Accident News) झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झालेत. तर 1 जण गंभीररीत्या जखमी झाला. स्विफ्ट कार आणि एसटी बस (Swift car and ST bus Head on Collision) यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात (Road accident news) झाला. या अपघातात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला तर एसटी बसचंही प्रचंड नुकसान झालं. अपघातामुळे स्विफ्ट कार आणि एसटी बस यांची झालेली अवस्था पाहून ही धडक किती भीषण होती, याची कल्पना करता येऊ शकेल.

तुळजापूर देवीचं दर्शन घेऊन लातूर जिल्ह्यातील उदगीरकडे भाविक परतत होते. मारुती स्विफ्ट कारने ते घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. भाविकांची कार वेगात समोरुन येणाऱ्या एसटी बसला धडकली आणि हा अपघात घडला.

उदगीरच्या एका हॉस्पिटलमध्ये काम कऱणारे काही जण आणि नर्सिंग कॉलेजचे 2 विद्यार्थी उदगीर शहराकडे निघाले होते. हैबतपूर पाटी जवळ आल्यानंतर पुढून येणाऱ्या एस बसला कारने समोरासमोर जोरदार धडक दिली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या एकाला तातडीने लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

अपघातातील मृतांची नावे

  • अलोक खेडकर (वय-21) रा. उदगीर
  • अमोल देवक्तते (वय-24) रा. रावणकोळ ता. मुखेड जि. नांदेड
  • कोमल कोद्रे (वय-22) रा. दोरनाळ ता. मुखेड जि. नांदेड
  • यशोमती देशमुख (वय-28) रा. यवतमाळ
  • नागेश गुंडेवार (वय-27) रा. उदगीर

एसटी बस ही उदगीरहून चाकूरकडे निघालेली होती. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर कारमधील भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी चक्क गाडीता पत्रा कापावा लागला. गॅस कटरच्या साहाय्याने गाडीचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. कार चालकाने नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पाच तरुणांच्या मृत्यूने उदगीर शहरावर शोककळा पसरली आहे. तसंच मृतांच्या कुटुंबीयांवरही मोठा आघात झालाय.

प्रियंका बनसोडे (वय-22) ही तरुणी या अपघातातून बचावली असली, तरी ती जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आपल्या सोबत असलेल्या पाच जणांच्या अपघाती मृत्यीने प्रियंकाला मोठा धक्काच बसलाय.

या अपघातानंतर काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार बाजूला केली. तर एसटीची समोरची काचही तुटली होती. तसंच ड्रायव्हरच्या बाजूच्या चाकालाही फटका बसला होता. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने या मार्गावर झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या अपघातातील सर्व मृतांची ओळख पटली असून पोलिसांनी या अपघातांची नोंद करुन घेतलीय.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.