बिश्नोई गँगचे कसे चालते कामकाज? कोणत्या राज्याची जबाबदारी कोणाकडे? शस्त्रे कशी मिळतात?

lawrence bishnoi network: बिश्नोई गँगमध्ये 700 पेक्षा जास्त शूटर आहेत. त्यातील 300 जण पंजाबमधील आहे. लॉरेंस बिश्नोई गँग फक्त पंजाबपर्यंत मर्यादीत नाही. त्याचे देश-विदेशात अनेक ठिकाणी नेटवर्क आहे. सोशल मीडिया आणि इतर मार्गाने गँगमधील भरती केली जाते.

बिश्नोई गँगचे कसे चालते कामकाज? कोणत्या राज्याची जबाबदारी कोणाकडे? शस्त्रे कशी मिळतात?
lawrence bishnoi
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 10:20 AM

lawrence bishnoi network: पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील मास्टरमाइंड गँगस्टर लॉरेंस बिश्नोई यांची गँग आता महाराष्ट्रात सक्रीय झाली आहे. त्याच्या गँगने सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी हत्या घडवून आणली. त्यानंतर लाँरेस बिश्नोईच्या गुंडगिरीच्या साम्राज्याची चर्चा होऊ लागली. दाऊद इब्राहीमप्रमाणे लॉरेंस बिश्नोई याने देशभरात आपले नेटवर्क उभे केले आहे. देशातील 11 राज्य आणि 6 देशांमध्ये त्याचे साम्राज्य पसरले आहे. भारतातील प्रत्येक राज्याची जबाबदारी त्याने वाटली आहे. बिश्नोई गँगला कुठून मिळतात शस्त्र? कोणत्या राज्याची जबाबदारी कोणावर? पाहू या…

महाराष्ट्राची जबाबदारी अनमोल विश्नोई याच्याकडे

गोल्डी बराड याच्याकडे कॅनडा, पंजाब आणि दिल्लीजी जबाबदारी दिली आहे. रोहित गोदारा याच्याकडे राजस्थान, मध्य प्रदेश आणि अमेरिकेचीसुद्धा जबाबदारी दिली आहे. त्याचबरोबर पोर्तुगाल, दिल्ली-एनसीआर, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगालमधील गँगची कमान अनमोल विश्नोई याच्याकडे आहे. हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये कला जथेडी गँगची सूत्र सांभाळत आहे. संपूर्ण गँगचा अहवाल थेट साबरमती कारागृहात बंद असलेल्या लॉरेन्स विश्नोईला दिला जात असतो.

शस्त्र कुठून मिळाली?

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडे शस्त्रे कुठून येतात हा प्रश्न आहे. बिश्नोई गँगकडे मध्य प्रदेशातील मालवा भागातून शस्त्रे येतात. त्यात धार, सेंधवा, बरवानी, रतलाम, खंडवा, बुरहानपूर, खरगोन या गावांचा समावेश आहे. तसेच उत्तर प्रदेशातील मेरठ, मुझफ्फरनगर आणि अलीगढ येथून त्यांना शस्त्र मिळतात. बिहारमधील मुंगेर आणि खगरिया भागातून शस्त्र ही गँग मागवते. तसेच पंजाबमधील सर्व शहरे पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत. याशिवाय पाकिस्तान, अमेरिका, रशिया, कॅनडा आणि नेपाळमधूनही शस्त्रास्त्रे येत आहेत.

हे सुद्धा वाचा

बिश्नोई गँगकडे 700 पेक्षा जास्त शूटर

बिश्नोई गँग सतविंदर सिंह उर्फ गोल्डी बराड ऑपरेट करत आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगमध्ये 700 पेक्षा जास्त शूटर आहेत. त्यातील 300 जण पंजाबमधील आहे. लॉरेंस बिश्नोई गँग फक्त पंजाबपर्यंत मर्यादीत नाही. त्याचे देश-विदेशात अनेक ठिकाणी नेटवर्क आहे. सोशल मीडिया आणि इतर मार्गाने गँगमधील भरती केली जाते.

एनआयएने लॉरेंस बिश्नोईची तुलना दाऊद इब्राहिमशी केली. एनआयएने चार्जशीट म्हटले आहे की, लॉरेंस बिश्नाई आणि त्याचे टेरर सिंडिकेट दाऊद इब्राहिमसारखे आहे. 1990 मध्ये दाऊदने या पद्धतीचे नेटवर्क उभारले होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.