पार्किंगच्या वादातून वकिलासह आईला मारहाण, हायप्रोफाईल सोसायटीतील धक्कादायक प्रकार

गाडी चुकीची लावली म्हणून वकिलाने जाब विचारला. या गोष्टीचा गाडी मालकाला राग आला आणि सोसायटीत राडाच झाला.

पार्किंगच्या वादातून वकिलासह आईला मारहाण, हायप्रोफाईल सोसायटीतील धक्कादायक प्रकार
डोंबिवलीत सोशल मीडियावर फोटो व्हायरल करत महिलेची बदनामीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 4:46 PM

डोंबिवली : कल्याण-शीळ मार्गावर हायप्रोफाईन सोसायटीत एक धक्कादायक घटना घडली आहे. वाहन पार्किंगवरुन झालेल्या वादातून तिघा जणांनी वकिलासह त्याच्या आईला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर आरोपी पळून गेले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शरद मनारी असे मारहाण झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर सागर पाटील, अरविंद पाटील अशी आरोपींपैकी दोघांची नावे आहेत. कल्याण-शीळ मार्गावरील पलावा वसाहतीत ही घटना घडली.

गाडी चुकीची उभी केल्याने जाब विचारला

पलावा वसाहतीतील व्हिएनतो इमारतीत वकील शरद मनारी राहतात. त्यांनी आपल्या इमारतीखाली आपली गाडी उभी केली होती. या गाडीच्या मागे आरोपी सागर पाटीलने गाडी लावली होती. यामुळे मनारी यांना त्यांची गाडी काढता येत नव्हती. यावरुन मनारी यांनी पाटील याला वाहन असे का उभे केले विचारले. मनारी यांच्या बोलण्याचा पाटील याला राग आला. सागर पाटील, त्याचा भाऊ अरविंद आणि अन्य एका इसमाने मनारी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आम्ही गाववाले आहोत तुला बघून घेतो, अशी धमकीही दिली.

मुलाला सोडवायला आलेल्या आईलाही मारहाण

मुलाला मारहाण होताना पाहून मनारी यांची आई सोडवायला मध्ये पडली. आरोपींनी तिलाही जमिनीवर पाडून मारहाण केली. यानंतर एका आरोपीने मनारी यांच्या पाठीत चाकूने वार केले. मनारी यांना जखमी करुन आरोपींनी तेथून पळ काढला. यानंतर मनारी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पुढील तपास पीएसआय जी.एस. मुसळे करत आहेत.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.