Mumbai Crime | धक्कादायक! जामिनाच्या आदेशावर मॅजिस्ट्रेटची खोटी सही, मुंबईतील घटना
Mumbai Crime | मॅजिस्ट्रेटची खोटी सही करण्यात इतपत कोणाची मजल गेली?. नेमकं हे प्रकरण काय आहे? हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात आरोपी बंद आहे. आरोपीच्या पत्नीला कधी समजलं तिची फसवणूक झाली? वकिलाने महिलेला काय सांगितलेलं?
मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. दहीसर पोलिसांनी दिंडोशी सत्र न्यायालयातील एका वकिलाविरोधात FIR नोंदवलाय. हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात बंद असलेल्या एका आरोपीच्या जामिनाशी निगडीत हे प्रकरण आहे. आरोपीच्या खोट्या जामिनाच्या आदेशावर वकिलाने मॅजिस्ट्रेटची खोटी सही केल्याचा आरोप आहे. हत्या प्रकरणात हा आरोपी तुरुंगात बंद आहे. आरोपीच्या पत्नीची तब्बल 90 हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली. आरोपीच्या पत्नीने वकिलाविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर आता मुंबई क्राइन ब्रांचकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
या प्रकरणात अजून कोणाला अटक झालेली नाही. कोर्टात गेल्यानंतर आरोपी नवऱ्याचा जामीन आदेश आणि बेल बॉण्डच्या रक्कमेची पावती नकली असल्याच तिच्या लक्षात आलं. तिने क्लार्कला पावती दाखवली तेव्हा आपली फसवणूक झाल्याच तिला समजलं. ऑगस्ट 2022 मध्ये एका जवळच्या नातेवाईकाने तिची वकिलाबरोबर भेट घडवून आणली. आरोपीला जामिनावर बाहेर काढू असं तिला वकिलाने आश्वासन दिलं. त्यासाठी 60 हजार रुपये लागतील असही सांगितलं. एका इंग्रजी वर्तमानपत्राने हे वृत्त दिलय. तुरुंगात तिला काय सांगितलं?
ती जामिनाचा आदेश घेऊन ठाण्याच्या तुरुंगात गेली. आरोपी नवऱ्याची सुटका होईल असं तिला वाटलं होतं. पण जामिनाची कागदपत्र अपुरी असल्याच तिला सांगण्यात आलं. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याच लक्षात आल्यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.