Bihar | दारुसाठी कल्ला, बिहारमधील पोलिसाचाही बाटलीवर डल्ला?

फोटो आहे बिहारच्या गोपालगंजमधील. हा फोटो सध्या ट्विटर फेसबुक तुफान व्हायरल झालाय. गोपालगंजमध्ये रस्त्यावर विखुरलेल्या दारुच्या बाटल्या पाहून लोकं चवताळली. दारुच्या बाटल्या लुटण्याची जणू स्पर्धाच लागली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलीसही या स्पर्धेत मागे राहिले नाही!

Bihar | दारुसाठी कल्ला, बिहारमधील पोलिसाचाही बाटलीवर डल्ला?
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 4:07 PM

दारुवरुन (liquor) भांडणं झाल्याच्या घटना अनेक याआधीही घडलेल्यात. सोबतच एखादा दारुचा एखादा ट्रक पलटी झाला की त्यावर हात साफ करण्याच्य बातम्याही अनेकदा तुम्ही वाचल्या असतीच. पण कधी या सगळ्यात पोलिसानंही दारुच्या बाटलीवार हात साफ केल्याचं ऐकलंय का? हरकत नाही.. आता ऐकालंच…

वरचा फोटो (Photo) पाहिलात ना? पोलिसाच्या कमरेला लावलेली बंदूक ठसठशीतपणे दिसत असेल. पण खिशातली हलकीशी बाहेर आलेली बाटली तुम्हाला दिसली तर मग तुम्हाला चष्मा लावायची गरज आहे. बाटलीचं तोंड खिशाच्या तोंडातून बाहेर आल्याचं फोटोत स्पष्टपणे दिसतंय. हा फोटो आहे कुठला, आणि त्याची संपूर्ण गोष्ट काय आहे, हे तर आता तुम्हाला जाणून घ्यावंच लागेल.

नेमकं घडलं काय?

फोटो आहे बिहारच्या गोपालगंजमधील. हा फोटो सध्या ट्विटर (Tweeter) फेसबुक (Facebook) तुफान व्हायरल (Viral) झालाय. गोपालगंजमध्ये रस्त्यावर विखुरलेल्या दारुच्या बाटल्या पाहून लोकं चवताळली. दारुच्या बाटल्या लुटण्याची जणू स्पर्धाच लागली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलीसही या स्पर्धेत मागे राहिले नाही! त्यांनी आपली कला या स्पर्धेत दाखवली असल्याची चर्चा रंगली आहे. खरंतर बिहारमध्ये दारुबंदी आहे. पण या फोटोनं दारुबंदीचं धगधगतं वास्तवही समोर आणलंय.

गोपालगंज जिल्ह्यातील सेमरा इथं टिपलेला हा फोटो आहे. गोपापूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एका छापेमारीत तब्बल 25 देशीदारुच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी तिथलं मुख्य असलेल्या विरेंद्र प्रसादला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर विरेंद्र प्रसादच्या समर्थकांनी रस्ता रोखून निदर्शनं करण्यास सुरुवात केली. त्यांचं असं म्हणणं होतं, की पोलिसांनी विरेंद्र प्रसादला अडकवण्यासाठी बनाव रचलाय.

देशीदारुसाठी उडाली झुंबड!

आता एखाद्या सिनेमाला लाजवेल असा घटनाक्रम यापुढे घडला. एका दुचाकीवर दोघंजण आले आणि त्यांनी लपवून ठेवलेल्या दारुच्या बाटल्या रस्त्यावर आणल्या. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या दारुच्या बाटल्या लुटण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. या सगळ्या गोंधळात पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही तस्कर पळ काढण्यात यशस्वी झाले.

यानंतर पोलिसांनी एका तस्कराला पुन्हा पकडलं. पण दुसरा मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. याबाबतचा जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात दारुच्या बाटल्या गोळा करण्यासाठी लोकांनी एकच गोंधळ घातला असल्याचं दिसतंय. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यातही घेतलंय. त्यांची दुचाकीही जप्त केली आहे. रस्त्यावर पडलेल्या देशी दारुच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पण पोलिसाच्या खिशात असलेल्या दारुच्या बाटलीबाबत अजूनतरी अधिकृतपणे कोणतीही माहिती जारी करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे पोलिसांनीही दारुच्या बाटल्यांवर हात साफ केला की काय, अशी शंका घेतली जाणं स्वाभाविक आहे.

इतर बातम्या – 

कल्याण रेल्वे परिसरात हल्लेखोर, चोरांचा सुळसुळाट, रेल्वे यार्डात तरुणावर चाकूहल्ला

वाद छोटा, कांड मोठा! दारुसाठी 20 रुपये दिले नाहीत म्हणून चक्क जीवच घेतला

वाढदिवशीच अमिरला संपवण्याचा होता कट! कट फसून 12 तासांत 12 जणांना अटक

सांगवीतील काटेपुरम चौकात भरदिवसा गोळीबार; एक जखमी, हल्लेखोर पसार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.