Love Affair | ‘साहेब प्रेम करण गुन्हा आहे का?’, दगाबाज पार्टनर तिला हॉटेलच्या रुममध्येच सोडून पळाला

Love Affair | प्रेम करण्यात चूक नाही. पण प्रेमात जोडीदार कसा आहे? हे वेळीच ओळखाव लागत. अन्यथा रडण्याची वेळ येते. अशीच फसवणूक एक प्रकरणात झालीय. आरोपी मुलीला हॉटेलमध्येच सोडून पळाला. हे प्रकरण वाढल्यानंतर पोलीस अधीक्षकांना हस्तक्षेप करावा लागला.

Love Affair | 'साहेब प्रेम करण गुन्हा आहे का?', दगाबाज पार्टनर तिला हॉटेलच्या रुममध्येच सोडून पळाला
Hotel room
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 1:35 PM

Love Affair | “साहेब, माझी काय चूक आहे? कोणावर प्रेम करण गुन्हा आहे का? समोरच्याने माझ्याशी लग्न केलं, तर त्याने मला त्याच्या घरी ठेवलं पाहिजे. पण तो मला हॉटेलमध्येच सोडून पळाला” हे बोलत असतानाच 19 वर्षाच्या मुलीला पोलीस अधीक्षकांसमोरच रडू कोसळलं. तिथे उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कसंबस तिला शांत केलं व आरोपी विरोधात तक्रार नोंदवली.

एसपी समोर तक्रार नोंदवण्यासाठी आलेली 19 वर्षांची मुलगी मागच्यावर्षी 26 जूनला विक्रम सोलंकीच्या संपर्कात आलेली. विक्रम खरगोन जिल्ह्याच्या बफलगावमध्ये राहतो. 6 महिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर विक्रम आणि या मुलीने 17 जानेवारीला आर्य मंदिरात लग्न केलं.

मुलगी कशीबशी पोलीस ठाण्यात पोहोचली

लग्नानंतर विक्रम मुलीला घरी घेऊन गेला नाही. त्याने तिला इंदूरच्या एका हॉटेलमध्ये ठेवलं होतं. मुलगी घरी नेण्यासाठी त्याच्या मागे लागली, तेव्हा त्याने मारहाण केली. तिला हॉटेलमध्ये सोडून तो पळाला. मुलगी कशीबशी बडवाह पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने आपला अनुभव सांगितला. अखिल भारतीय बलाई महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली.

जिल्ह्याच्या एसपीला करावा लागला हस्तक्षेप

जाती संघटनेचे लोक पीडितेसोबत पोलीस ठाण्यात पोहोचले. पण पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही. त्यानंतर पीडित युवती खरगोनचे एसपी धर्मवीर सिंह यांच्याजवळ गेली. एसपीच्या हस्तक्षेपानंतर बडवाह पोलीस ठाण्यात आरोपी विक्रम सोलंकी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.