लीलाने ऑफिसबाहेर पाऊल टाकताच मागचं सगळं विसरला, थेट गाठलं क्रौर्याच टोक
काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. इतकी क्रूरता माणसामध्ये कुठून येते? तो तिच्या ऑफिसजवळ तिला भेटण्यासाठी म्हणून आला होता.
बंगळुरु : तुम्ही प्रेमात पडता, त्यावेळी चांगल्या आठवणींबरोबर वादविवाद सुद्धा होतात. प्रत्येकवेळी प्रेम यशस्वी होत असं नाहीय. काहीवेळा प्रेमात अपयश येतं. हे अपयश पचवण्याची ताकत फार कमी जणांमध्ये असते. काही विकृत मागचा-पुढचा विचार न करता, आपल्याच जोडीदाराला आयुष्यातून संपवतात. आपण त्या व्यक्तीवर प्रेम केलय, तिने सुद्धा आपल्याला जीव लावलाय, याचा त्यांना विसर पडतो. अशी एक धक्कादायक घटना पूर्व बंगळुरुच्या मुरुगेशपालया येथे मंगळवारी संध्याकाळी घडली. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्यांनी जे पाहिलं, त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला.
दोघेही मूळचे कुठले निवासी?
लीला पविथ्रा नालामती असं मृत तरुणीच नाव आहे. ती 25 वर्षांची होती. लीला मूळची आंध्र प्रदेश काकीनाडाची निवासी आहे. ती पूर्व बंगळुरुमध्ये एका कंपनीत नोकरीला होती. या प्रकरणात आरोपी 28 वर्षांचा असून दिनाकर बानाला त्याचं नाव आहे. तो सुद्धा आंध्र प्रदेशच्या निवासी आहे. दोघेही हेल्थ केअर क्षेत्रात नोकरीला होते. लीला जेबी नगर येथे पीजीमध्ये रहात होती. दिनाकर डोमलुरला रहायला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
लीलाच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध ?
लीला पविथ्रा नालामतीची ऑफिसबाहेर मंगळवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास हत्या झाली. लीला आणि दिनाकर पाच वर्षांपूर्वी परस्परांच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण लीलाचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते. मुलगा दुसऱ्या जातीचा असल्यामुले लीलाच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. ऑफिसबाहेर पाऊल ठेवताच दोघांमध्ये वादावादी
लीलाने तिच्या कुटुंबीयांच्या निर्णयाची दिनाकरला माहिती दिली. दिनाकर लग्नासाठी अडून बसला होता. तो तिच्या ऑफिसजवळ तिला भेटण्यासाठी म्हणून आला. लीलाने ऑफिसबाहेर पाऊल ठेवताच दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. दिनाकरने रागाच्या भरात सोबत आणलेला चाकू बाहेर काढवा सर्वांसमक्ष तिच्यावर 16 वार केले. जीवन बिमा नगरच्या पोलिसांना या बद्दल माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिनाकर विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. पुढील तपास सुरु आहे.